Join us  

IPL 2021 : इयॉन मॉर्गनला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार; शेन वॉर्नची वादात उडी, आर अश्विनवर टिका

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 5:36 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीच्या वेळेत रिषभ पंतनं जवळपास यष्टिरक्षक दिनेश कार्तिक याला जखमी केलंच होतं. त्यात दिल्लीच्या डावातील अखेरच्या षटकात आर अश्विन व KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. मॉर्गन व अश्विन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. राहुल त्रिपाठीनं केलेल्या थ्रोवर अश्विननं अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्याचवेळी जंटलमन गेमला गालबोट लागला आणि मॉर्गन व अश्विन भिडले. आता या वादात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यानं उडी घेतली आणि त्यानं अश्विनवर टीका केली. ( shane Warne has lashed out at the DC spinner over the extra-run controversy)

नेमकं काय घडलं?अखेरचं षटक कोलकाताचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी टाकत होता. साऊदनं टाकलेल्या शॉर्ट पिच बॉलवर मोठा फटका मारण्याचा अश्विननं प्रयत्न केला. त्यावेळी चोरटी धाव घेणाऱ्या अश्विनसोबत वाद झाला. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन देखील पुढे येत असल्याचं अश्विननं पाहिलं आणि तो पुन्हा माघारी फिरला अन् साऊदी, मॉर्गनच्या अंगावर धावून गेला. यावेळी ऋषभ पंत देखील पुढे सरसावला. दिनेश कार्तिकनं मध्यस्थी करत अश्विन, पंतला रोखलं.  ''अश्विनचं हे वागणं अस्वीकाहार्य आहे. त्याचं वागणं खेळभावनेला तडा देणारं असून मॉर्गनला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार होता,'' असे मत वॉर्ननं व्यक्त केलं.

 कोलकाताची दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं मात, राणा चमकला; व्यंकटेशची गोलंदाजीत कमाल  दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं दणदणीत विजय साजरा करत कोलकाता नाइट रायडर्सनं प्ले-ऑफमधील आपल्या दावेदारीचं आव्हान कायम ठेवलं आहे. शारजाच्या मैदानात झालेल्या या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत २० षटकांच्या अखेरीस १२६ धावांवर रोखलं होतं. त्यानंतर कोलकातानं दिल्लीनं आव्हान ३ विकेट्स आणि ११ चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह कोलकाताच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. कोलकाताचा संघ १० गुणांसह आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१आर अश्विनदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App