IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज ९व्यांदा आयपीएल फायनल खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर कोलकाता नाइट रायडर्सचे ( Kolkata Knight Riders ) आव्हान आहे. महेंद्रसिंग धोनीची ही १४व्या पर्वातील १०वी आयपीएल फायनल आहे. त्यानं पाच आयपीएल फायनल मुंबई इंडियन्सविरुद्ध, १ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध, १ सनरायझर्स हैदराबाद आणि १ राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळली आहे. आज तो कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध फायनल खेळणार आहे. या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच महेंद्रसिंग धोनी MS Dhoni मोठा विक्रम नावावर करणार आहे. आतापर्यंत एकाही कर्णधाराला हा पराक्रम करता आलेला नाही.
महेंद्रसिंग धोनीचे त्रिशतक...
महेंद्रसिंग धोनीची हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील कर्णधार म्हणून ३००वा सामना आहे. ( MS Dhoni will become the first captain to lead 300 matches in T20 format) त्यानं टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचे नेतृत्व करताना २९९ सामने खेळले. २०१७मध्ये त्यानं टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले. २००७ साली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयापासून ते २०१७ पर्यंत त्यानं ७२ सामन्यांत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषविले. त्यापैकी ४१ सामने भारतानं जिंकले, तर २८ मध्ये पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सकडून त्यानं २१३ सामन्यांत नेतृत्व सांभाळले आणि त्यात जय-पराजयाची आकडेवारी ही १३०-८१ अशी राहिली आहे. २०१६ मध्ये त्यानं रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली आणि १४ पैकी केवळ त्याला ५ सामने जिंकता आले. ( IPL, CL T20, Asia Cup, T20 World Cup - he has won every major T20 Trophy in the world)
Web Title: IPL 2021 Final, CSK vs KKR Live Updates : MS Dhoni will become the first captain to lead 300 matches in T20 format
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.