IPL 2021, MS Dhoni: ऑस्ट्रेलियाचा (Australia Cricket Team) माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांच्या मतानुसार चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) ही शेवटची आयपीएल स्पर्धा असणार आहे. यंदाच्या सीझननंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होईल आणि तो मैदानात परत दिसेल असं वाटत नाही, असं ब्रॅड हॉग यांनी म्हटलं आहे.
एमएस धोनी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून यशस्वी राहिला आहे. यंदाच्या सीझनमध्येही सीएसकेनं जबरदस्त पुनरागमन करत धोनीनं आपले कर्णधारी गुण पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहेत. पण त्याच्या बॅटमधून काही चांगल्या धावा अद्याप निघालेल्या नाहीत. आयपीएलच्या यंदाच्या सीझननंतर पुढील सीझनसाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. यात धोनी संघातील स्वत:ची जागा सोडून देईल आणि स्वत:च्या जागी एखाद्या युवा खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शमीला येतोय एका गोष्टीचा प्रचंड राग, स्पष्टच बोलून दाखवलं!
"मला वाटतं एमएस धोनी आयपीएल २०२१ नंतर संन्यास घेईल. कारण गेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीच्या फिरकीवर तो ज्या पद्धतीनं बाद झाला यातूनच सारंकाही दिसून येतं. त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप जागा राहिली होती. त्यामुळे ४० वर्षीय धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळेल असं मला वाटत नाही. असं असलं तरी त्याचं यष्टीरक्षण आजही कमाल आहे", असं ब्रॅड हॉग म्हणाले.
चेन्नई सुपरकिंग्जचा प्रशिक्षक होण्याची शक्यतामहेंद्रसिंग धोनी याची आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मेंटॉरपदी नियुक्ती झाली आहे. त्याच पद्धतीनं आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या व्यवस्थापकीय मंडळात महत्त्वाची भूमिका किंवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिसू शकतो, असंही हॉग म्हणाले. स्टीफन प्लेमिंगच्या साथीनं युवा टँलेंट शोधण्यासाठी आणि त्यांना घडविण्यासाठी धोनी येत्या काळात मोठी भूमिका पार पाडू शकतो. धोनीसारख्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची भारतीय क्रिकेटला खूप आवश्यकता आहे. त्याचा खूप मोठा फायदा युवा खेळाडूंना होईल, असंही ते पुढे म्हणाले.