IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल!

IPL 2021, Gautam Gambhir: प्रत्येक सामन्यापूर्वी गौतम गंभीर याला सुत्रसंचालकाकडून काही अंदाज व्यक्त करण्याची संधी दिली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:53 PM2021-04-15T23:53:49+5:302021-04-15T23:55:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Gautam Gambhir wrong prediction getting troll on social media | IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल!

IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Gautam Gambhir: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्रत्येक सामना रोमांचक ठरताना दिसतोय. आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी जवळपास प्रत्येक सामना सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत गेला आहे आणि क्रिकेट चाहत्यांना टी-२० चा थरार अनुभवता आला आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्याआधी 'क्रिकेट लाइव्ह' या कार्यक्रमातून आगामी सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक चर्चा करत असतात. यात भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर, पार्थिव पटेल, समालोचक आकाश चोप्रा आणि इतर सुत्रसंचालकांचा समावेश असतो. 

प्रत्येक सामन्यापूर्वी गौतम गंभीर याला सुत्रसंचालकाकडून काही अंदाज व्यक्त करण्याची संधी दिली जाते. यात गौतम गंभीर आणि पार्थिक पटेल सामन्याबाबत काही अंदाज व्यक्त करतात. पण गौतम गंभीर व्यक्त करीत असलेले अंदाज फोल ठरत असल्याचं दिसून आलं आहे. मग काय नेटिझन्सला आयतं कोलित हाती सापडलं आणि गंभीरला ट्रोल करणं सुरू केलं आहे.

गौतम गंभीरनं आजच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात दिल्लीच्या अष्टपैलू मार्क स्टॉयनिस सर्वाधिक षटकार लगावेल असा अंदाज व्यक्त केला. पण सामन्यात मार्क स्टॉयनिस शून्यावर माघारी परतला. इतकंच काय तर दिल्लीकडून एकाही फलंदाजाला षटकार लगावता आला नाही. वानखेडे स्टेडियमवर आजवर झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये आज इतिहास घडला की एका डावात एकही षटकार लगावला गेला नाही. 

गंभीरनं याच सामन्यासाठी रिषभ पंत याला राजस्थान रॉयल्सचा राहुल तेवतिया बाद करेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण सामन्यात रिषभ पंत यानंच सर्वाधिक ५१ धावांची खेळी साकारली. 

कोलकाता वि. मुंबई सामन्याचाही अंदाज चुकला
गौतम गंभीरनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात कोलाकाताच आंद्रे रसेल सर्वाधिक षटकार ठोकेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण आंद्र रसेल या सामन्यात अवघ्या ९ धावांवर बाद झाला आणि केवळ एक षटकार ठोकू शकला. 
 

Web Title: IPL 2021 Gautam Gambhir wrong prediction getting troll on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.