इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात सोमवारी कोरोना व्हायरसनं हल्लाबोल केल्याचे दिसले आणि कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Knight Riders and Royal Challengers Bangalore ) यांच्यातला आज खेळवण्यात येणारा सामना स्थगित करण्यात आला. KKRच्या संघातील वरूण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांनाही विलगीकरणात ठेवले आहे, परंतु KKRच्या बायो बबलमध्ये अचानक आलेल्या संकटामुळे आजचा सामना पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. KKRचा पुढील सामना ८ मे ला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे आणि तोही सामना स्थगित होईल, अशी चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव; तीन सदस्यांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, कोटलावरील पाच ग्राऊंड्समन्सनाही लागण
चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) CEO कासी विश्वनाथन, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व बस क्लिनर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोटला मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत आणि त्या स्टेडियमवर काम करणाऱ्या पाच ग्राऊंड्समनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. यामुळे आता आयपीएल स्पर्धा रद्द होईल का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. पण, BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना मिळेपर्यंत सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, हे स्पष्ट केले. IPL 2021 : पॅट कमिन्सनं PM Cares Fundला पैसे देण्याचा निर्णय घेतला मागे; पण, भारताला मदतीचं वचन कायम!
वरिष्ठ पत्रकार Meha Bhardwaj यांनी ट्विट केलं की, आताच BCCI अधिकाऱ्याशी बोलणं झालं, आजच्या सामन्याव्यतिरिक्त अन्य कोणताही सामना स्थगित केलेला नाही. तसेच दररोज कोरोना चाचणी होणाऱ्या खेळाडूंनी विलगीकरण होण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.