IPL 2021, Corona Virus: भारतात सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत असल्याचीही प्रकरणं पुढे येत आहेत. देशाच्या अशा संकटाच्या काळात अनेक क्रिकेटपटू पुढे येऊन मदत करत आहेत. सचिन तेंडुलकरसह अजिंक्य रहाणे, पॅट कमिन्स, ब्रेट ली यांच्यासह अनेक क्रिकेटपटू पुढाकार घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता मुंबई इंडियन्सचे शिलेदार पंड्या बंधू देखील यांचाही समावेश झाला आहे.
अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत
हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या मैदानात आक्रमक खेळीसाठी तर ओळखले जातातच पण सामाजिक कार्यातही ते पुढाकार घेत असतात. देशात कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असताना पंड्या बंधूंनी देशाच्या ग्रामीण भागात ऑक्सिजन संच पुरविण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. पंड्या बंधू आणि कुटुंबियांनी एकूण २०० ऑक्सिजन संचांची मदत जाहीर केली आहे. (IPL 2021: Hardik Pandya announces his family will donate 200 oxygen concentrators to fight COVID-19 in rural parts of India)
'हे तर Lays चं पाकीट'... ख्रिस गेल, यजुवेंद्र चहलच्या 'पोझिंग'वर भन्नाट मिम्स! एकदा पाहाच...
चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलत असताना हार्दिक पंड्यानं याबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या संकट काळात आम्ही इथं खेळत असलो तरी आमचे कुटुंबिय सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं हार्दिकनं सांगितलं. देशात सध्या ऑक्सिजन संचांची ग्रामीण भागात खूप गरज असल्यानं त्यासाठीची आवश्यक मदत करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे, असी माहिती हार्दिकनं यावेळी दिली.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
"देश सद्या कोणत्या संकटातून जातोय याची पूर्णपणे आम्हाला जाणीव आहे. सध्याचा काळ खूप कठीण आहे. देशातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मी सॅल्यूट करतो. देशातील जो नागरिक आज एकमेकांना मदत करतोय त्या सर्वांना माझा सॅल्यूट आहे. त्यामुळे आपणही काहीतरी मदत करायला हवी यासाठी मी आणि कृणालसह कुटुंबियांनी देशातील ग्रामीण भागांमध्ये २०० ऑक्सिजन संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ज्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेला मदत करण्याची गरज वाटेल तिथं आम्ही नक्कीच मदत करू", असं हार्दिक पंड्या म्हणाला.
Web Title: IPL 2021 Hardik Pandya announces his family will donate 200 oxygen concentrators to fight COVID-19 in rural parts of India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.