IPL 2021, SRH: आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी हैदराबादचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज डेव्हड वॉनर (David Warner) मैदानात उपस्थित नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. हैदराबादच्या संघात वॉर्नरला संधी देण्यात आली नसली तरी तो स्टेडियमवर येण्याऐवजी हॉटेलमध्ये का थांबला? असा सवाल उपस्थित केला गेला. या संपूर्ण प्रकरणावर आता सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस (Trevor Bayliss) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
'महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार'
डेव्हिड वॉर्नर आणि संघातील वादाबाबत त्यांनी सर्व चर्चा फेटाळल्या. "संघात अनेक युवा खेळाडू आहेत. त्यांना मैदानातील वातावरणाचा आणि दबावात्मक परिस्थितीचा अनुभव मिळावा यासाठी डेव्हिड वॉर्नरला हॉटेलमध्येच थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता", असं हैदराबादचे प्रशिक्षक म्हणाले.
संजू सॅमसनच्या ८२ धावांवर भारी पडला जेसन रॉय, SRHनं विजय मिळवत प्ले ऑफचं गणित बिघडवलं
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर याच्या अनुपस्थितीतबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, "आमच्या संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे आणि या सामन्याआधीच आम्ही संघात काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. युवा खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशानं आम्ही जे १८ खेळाडू आजवर संघाचा भाग होऊ शकले नाहीत त्यांना खेळात आणण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. संघात जागा देता आली नाही. तरी या युवा खेळाडूंना मैदानातील वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी असं आम्हाला वाटलं"
आमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांना हॉटेलमध्येच थांबावं लागलं होतं. त्यांना मैदानात उपस्थितीचा अनुभव आजवर मिळालेला नाही. त्यामुळेच जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी या सामन्यात डेव्हिड वॉर्नर, केदार जाधव आणि शाहबाद नदीम यांना मैदानात न आणण्याचा निर्णय घेतला गेला होता, असंही ट्रेवर बेलिस म्हणाले.