IPL 2021: भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधीएल चार संघांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतातील या परिस्थीतीचं खूप वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन यांनं व्यक्त केली आहे. आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केल्यानंतर केव्हीन पीटरसन यानं भारताला पाठिंबा देणारं एक ट्विट केलं आहे. (ipl 2021 Heart breaking to see a country I love so much suffering Kevin Pietersen reacts after IPL 2021 gets postponed indefinitely)
केव्हीन पीटरसन यानं भारतातील नागरिकांना डगमगून न जाण्याचं आवाहन करत देशानं आजवर दाखवलेल्या नम्रतेचं आणि उदारतेचं फळ नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. "ज्या देशावर माझं खूप प्रेम आहे असा भारत देश सध्या ज्या संकटाला सामोरा जातोय ते पाहून खूप त्रास होतोय. पण तुम्ही नक्कीच यावर मात करुन उभारी घ्याल. देश पुन्हा मजबूत होईल. तुम्ही आजवर दाखवलेला दयाळूपणा आणि उदारता केव्हाच वाया जाणार नाही. तुम्ही आजवर केलेल्या उपकारांचं या संकटकाळात नक्कीच फळ मिळेल", असं ट्विट केव्हीन पीटरसन यांनं केलं आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे कालचा कोलकाता विरुद्ध बंगलोर यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स संघातील अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील वृद्धीमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं आजच्या सामन्यावरही गंडांतर आलं. अखेर बीसीसीआयनं खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
Web Title: ipl 2021 Heart breaking to see a country I love so much suffering Kevin Pietersen reacts after IPL 2021 gets postponed indefinitely
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.