Join us  

IPL 2021: Hershal Patelकडे IPLमध्ये इतिहास रचण्याची संधी, कुठल्याही भारतीय गोलंदाजाला करता आली नाहीये अशी कामगिरी 

Hershal Patel, IPL 2021: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार गोलंदाज हर्षल पटेल याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. हर्षलने यंदाच्या हंगामात आतापर्यंत १३ सामन्यांमधून २९ बळी टिपले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 9:33 AM

Open in App

मुंबई - यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार गोलंदाज हर्षल पटेल याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. हर्षलने यंदाच्या हंगामात आतापर्यंत १३ सामन्यांमधून २९ बळी टिपले आहेत. (Hershal Patel) यंदाच्या आयपीएलमधील पर्पल कॅप हर्षल पटेलकडे असून, आता एक नवा विक्रम नोंदवण्याची संधी हर्षल पटेलकडे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला असून, आता त्यांचे किमान दोन सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत हर्षल पटेलकडे आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची संधी आहे. हर्षल पटेल चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. (Hershal Patel has a chance to make history in IPL, a feat no Indian bowler has been able to achieve)

ड्वेन ब्राव्होने आयपीएल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना १८ सामन्यात ३२ बळी टिपले होते. त्यावर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्याशिवाय आयपीएल २०२० मध्ये कागिसो रबाडाने १७ सामन्यात ३० विकेट्स घेऊन दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलमध्ये केवळ हेच दोन गोलंदाज एका हंगामात ३० विकेट्सचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात काही विकेट्स मिळवल्यास ब्राव्हो आणि रबाडाच्या क्लबमध्ये दाखल होण्याची संधी हर्षल पटेलकडे असेल.

हर्षल पटेल आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आधीच बनला आहे. तत्पूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. त्याने गेल्या हंगामात २७ बळी टिपले होते. तर भुवनेश्वर कुमारने २०१७ मध्ये २६ विकेट्स टिपले होते. दरम्यान, हर्षल पटेलने आयपीएलमध्ये खेळलेल्या ६१ सामन्यात आतापर्यंत ७५ बळी टिपले आहेत.

हर्षल पटेलने २०१२ मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो २०१७ पर्यंत आरसीबीचा सदस्य होता. या काळात त्याने ३६ सामन्यात ३४ बळी टिपले होते. मात्र २०१८ मध्ये आरसीबीने हर्षल पटेलला रिलीज केले होते. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. या काळात त्याला केवळ १२ सामने खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान, या हंगामान विराटने हर्षल पटेलवर विश्वास दर्शवत त्याचा आरसीबीमध्ये समावेश केला. दरम्यान, हर्षल पटेलनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App