IPL 2021, Nitish Rana: आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सनं १० धावांनी विजय प्राप्त केला. कोलकाताच्या विजयात नितीश राणाच्या अर्धशतकी खेळीचा सिंहाचा वाटा राहिला. नितीशनं ५६ चेंडूत ८० धावांची तडफदार खेळी साकारली आणि सामनावीराचा मानकरी ठरला. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे नितीश राणानं त्याचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर केलेलं खास सेलिब्रेशननं. नितीशनं आपलं अर्धशतकी सेलिब्रेशन एका खास स्टाइलमध्ये केलं आणि सोशल मीडियात याची जोरदार चर्चा सुरू झाली. (IPL 2021: How a Punjabi song prompted Nitish Rana to develop a new celebration)
सामना संपल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल झालेला फिरकीपटू हरभजन सिंग यानंच यामागचं रहस्य उलगडलं. हरभजन सिंगनं सामना संपल्यानंतर नितीश राणांची छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत हरभजननं नितीश राणाला त्याच्या खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारला. तर नितीश राणानं यामागे एक पंजाबी गाण्याचं योगदान असल्याचं म्हटलं आणि ते खास सेलिब्रेशन त्याच्या मित्रमंडळींसाठी होतं, असं त्यानं सांगितलं.
"माझं सेलिब्रेशन हे माझ्या मित्रमंडळींसाठी होतं. माझा संपूर्ण ग्रूप 'ब्राऊन मुंडे' गाण्याचा चाहता आहे. आम्हाला सगळ्यांना ते गाणं खूप आवडतं. सीझन सुरू होण्याआधीच मी मित्रांना सांगितलं होतं की संधी मिळाली तर नक्की स्टेडियमवर याचं सेलिब्रेशन करेन", असं नितीशनं सांगितलं.
नितीश राणानं विजय शंकरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकात ठोकून धडाकेबाज अंदाजात अर्धशतक पूर्ण केलं होतं. अर्धशतकाचं सेलिब्रेशन करताना नितीश राणानं हातातील ग्लोज काढून खास स्टाइलमध्ये आनंद व्यक्त केला आणि आपलं अर्धशतक मित्रमंडळींना बहाल केलं.
नितीश राणानं खास सेलिब्रेशनमागे पंजाबी गाणं दडल्याचं म्हटलं तेही सोबत हरभजन सिंग असेल आणि गाणं गुणगुणलं जाणार नाही असं कसं होईल. मग हरभजन आणि नितीश राणानं 'ब्राऊन मुंडे' गाणं आपल्या चाहत्यांसाठी म्हणून दाखवलं.
Web Title: IPL 2021 How a Punjabi song prompted Nitish Rana to develop a new celebration
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.