मुंबई इंडियन्सने शनिवारी कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान १३ धावांनी परतावले. फलंदाजांनी आपले काम केल्यानंतर गोलंदाजांनी चोख जबाबदारी पार पाडताना हैदराबादला जखडवून ठेवले. त्यामुळेच, कर्णधार रोहित शर्माने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले. मात्र, चाहत्यांना यामध्ये क्षेत्ररक्षकांचेही योगदान मोलाचे असल्याचे वाटते. त्यामुळेच सोशल मीडियावर क्षेत्ररक्षकांचे आणि त्यातही विशेष करुन हार्दिक पांड्याचे कौतुक होत असल्याचे दिसून आले. इतकेच नाही, तर यावेळी नेटिझन्सनी सीएसकेलाही चिमटा काढत मुंबई किती समतोल आहे आहे हेही सांगितले. याला कारणही तसेच आहे.
'हिटमॅन' रोहितनं बेधडक कबुल केलं हैदराबादाच्या दोन गोलंदाजांविरुद्ध खेळणं कठीण
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १५० धावांची समाधानकारक मजल मारल्यानंतर हैदराबादचा पूर्ण संघ १३७ धावांत गुंडाळला गेला. गोलंदाजांनी नक्कीच यावेळी जबरदस्त कामगिरी केली. मात्र, क्षेत्ररक्षकांनीही अचूक झेल घेत हैदराबादला धक्के देण्यात मोलाचे योगदान दिले. शिवाय यामध्ये हार्दिक पांड्याने दोन अप्रतिम धावबाद करत हैदराबादला बॅकफूटवर नेले. हार्दिकने आधी सलामीवीर आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्यानंतर मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या अब्दुल समद यांना धावबाद करत मुंबईच्या मार्गातील अडसर दूर केले होते.
SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?
मुंबईच्या या सामन्याआधी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या विजयामध्येही अष्टपैलू रवींद्र जडेजाने अशीच कामगिरी केली होती. चेन्नईविरुद्ध पंजाबचा डाव ८ बाद १०६ धावांत रोखला गेला होता. दीपक चहरच्या भेदकतेसह जडेजाची चपळ फिल्डिंग निर्णायक ठरली होती. जडेजाने सलामीवीर आणि कर्णधार लोकेश राहुलला धावबाद करताना ख्रिस गेल आणि शाहरुख खान यांचे अप्रतिक झेल घेतले होते.
नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'
त्यामुळेच सोशल मीडियावर नेहमी गाजणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स ही लढत अनुभवण्यास मिळाली. चेन्नईच्या विजयानंतर सीएसके समर्थकांनी जडेजाची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे कौतुक केले होते. तर आता मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या हार्दिक पांड्याची पोस्ट करताना मुंबई इंडियन्सच्या समर्थकांनी सीएसके पाठिराख्यांना चिमटा काढत पोस्ट केली आहे की, ‘जर तुमच्याकडे जड्डू आहे, तर आमच्याकडे पांड्या आहे.’
Web Title: IPL 2021 if csk have ravindra jadeja then mumbai indians have hardik Pandya for best fielding
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.