-ललित झांबरे
आयपीएलमधील (IPL) बुधवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुध्द(CSK) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) डाव अतिशय नाट्यमय राहिला. 221 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरची 5.2 षटकातच 5 बाद 31अशी दयनीय सुरुवात झाली. कर्णधार ओईन माॕर्गनसह आघाडीचे पाच फलंदाज पाॕवर प्लेमध्येच बाद झाले मात्र त्यानंतरही केकेआरने 202 धावांपर्यत मजल मारली. यादरम्यान काही काळ विजयाच्या शक्यताही निर्माण केल्या याचे श्रेय सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे फलंदाज अनुक्रमे दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल व पॕटरसन कमिन्स यांनी. या तिघांनी तब्बल 200 च्या स्ट्राईक रेटने 80 चेंडूतच 160 धावांची भर घालून सामन्यात जान आणली. कार्तिकने 24 चेंडूत 40, रसेलने फक्त 22 चेंडूतच 54 आणि कमिन्सने 34 चेंडूतच नाबाद 66 धावा फटकावून काढल्या. (If KKR had won, would it have happened for the second time?)
यासह 5 बाद 31 वरुन सावरलेल्या केकेआरच्या विजयाच्या शक्यता निर्माण केल्या होत्या.अखेरच्या दोन षटकात 28 धावा आणि दोन गडी हाताशी असे समीकरण झाले होते. आठव्या क्रमांकावर सर्वोच्च खेळी करणारा कमिन्स खेळपट्टीवरा होता पण दुर्देवाने समोरच्या टोकाला साथीदार न उरल्याने केकेआरला 18 धावांनी हा सामना गमवावा लागला पण आयपीएलच्या इतिहासातील अतिशय मनोरंजक सामन्यांपैकी तो एक ठरला.
आयपीएलच्या इतिहासात पाॕवर प्लेमध्ये निम्मा संघ गमावल्यानंतरही सामना जिंकायची जादू याच्याआधी आतापर्यंत एकदाच झालेली आहे. कोलकाता तसा दुसरा संघ ठरला असता पण तसे झाले नाही. 2016 च्या आयपीएलमध्ये गुजराथ लायन्सविरुध्द राॕयल चॕलेंजर्सची सहा षटकाअखेर 5 बाद 31 अशी अवस्था होती मात्र त्यानंतरही त्यांनी 159 धावांचे विजयी लक्ष चार गडी राखून गाठले होते. यावेळी केकेआरसमोरचे आव्हान मात्र कठीण होते. पाॕवर प्लेअखेर 5 बाद 45 आणि 221 धावांचे डोंगराएवढे लक्ष त्यांना गाठायचे होते. त्यासाठी ते झुंजले पण 18 धावांनी कमी पडले.