Join us

IPL 2021: "होय, जोफ्रा आर्चर संघात नसणे हा मोठा धक्काच"; कुमार संगकारा चिंतेत!

जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर याची अनुपस्थिती हा एक मोठा धक्का आहे, असे मत राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 18:41 IST

Open in App

मुंबई : जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर याची अनुपस्थिती हा एक मोठा धक्का आहे, असे मत राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी आशा देखील व्यक्त केली याचा फायदा युवा भारतीय गोलंदाज नक्कीच घेतील.

हाताच्या दुखापतीनंतर इंग्लंडच्या या स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो सध्या आराम करत आहे. जोफ्रा आयपीएलसाठी केव्हा उपलब्ध होऊ शकतो याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. ं"संजु सॅमसन आणि मी सहमत आहोत की जोफ्रा संघात नसणं आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे. तो संघाचा महत्वाचा भाग आहे. मात्र हे लक्षात घेऊन आता त्यानुसार योजना बनवत आहोत", असं कुमार संगकारानं सांगितलं.

गेल्या काही वर्षांपासुन राजस्थान रॉयल्ससाठी गोलंदाजी ही कमकुवत राहिली आहे. त्यांचा सर्वात अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकट हा चांगला खेळ करु शकलेला नाही. त्यासोबतच त्यांच्याकडे चेतन सकारिया आणि कार्तिक त्यागी हे पर्याय आहेत.

"अनुभवाची कमतरता हे कदाचित आमच्यासाठी जमेची बाजू देखील ठरू शकते. आमच्याकडे कुलदीप यादव (ज्युनियर) चेतन सकारीया यांच्या रुपाने अतिरिक्त गोलंदाज आहेत. दबाव हा नेहमीच असतो. मग तो संजु असो वा राहुल वास्तविकता स्वीकारावी लागते. खेळाडूंकडून नेहमीच अपेक्षा केली जाते आणि तुम्हाला दबावाचा सामना करावा लागतो", असंही संगकारा म्हणाला.  

टॅग्स :जोफ्रा आर्चरराजस्थान रॉयल्सआयपीएल २०२१कुमार संगकारा