इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) राजस्थान रॉयल्ससाठी ( RR) संकटाचं ठरत आहे. आतापर्यंत चार पैकी केवळ एक सामना जिंकून Rajasthan Royalsचा संघ गुणतक्त्यात तळावर आहे. त्यात एकामागून एक परदेशी खेळाडू माघार घेत असल्यानं त्यांचं टेंशन वाढत चालले आहे. संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) नेतृत्वाची आता खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे. बेन स्टोक्स ( Ben Stokes) यानं बोटाच्या दुखापतीमुळे माघार घेतली, लायम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone) बायो बबलला कंटाळून मायदेशी परतला अन् आता जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) हाही आयपीएल २०२१ खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. झिम्बाब्वेनं पाकिस्तानची लाज काढली; संपूर्ण संघाला ९९ धावांवर माघारी पाठवून मिळवला ऐतिहासिक विजय
दुखापतीमुळे आर्चर मायदेशातच होता, परंतु तो त्यातून सावरू लागला होता. तो आयपीएलच्या मध्यांतरापर्यंत तरी भारतात येईल अशी आशा RRला होती, परंतु शुक्रवारी तिही मावळली. कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आर्चर आयपीएलमधून माघार घेत असल्याच्या वृत्ताला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं दुजोरा दिला आहे. जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत तो मैदानावर उतरण्याची शक्यता आहे, परंतु त्याता तंदुरूस्त चाचणी पास करावी लागेल.
मागील आठवड्यात बेन स्टोक्सनं बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून माघार घेतली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा झेल टिपताना त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो १२ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं. त्यानंतर सोमवारी लिव्हिंगस्टोन मायदेशी परतला.
''सोमवारी लायम लिव्हिंगस्टोन मायदेशी परतला. तो गेली एक वर्ष बायो बबलमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. त्याच्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो. संघाला जमेल तसा पाठिंबा तो देत राहील,''असे राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.