बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांनी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानं चर्चेत आल्या आहेत. नसरीन यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मोइन अलीच्या समर्थनार्थ आता इंग्लंडचे क्रिकेटपटू देखील पुढे आले आहेत.
क्रिकेटपटू झाला नसता तर सीरियात ISISचा अतिरेकी झाला असता, CSKच्या खेळाडूबाबत तस्लीमा नसरीनचं वादग्रस्त विधान
मोईन अलीबाबतच्या ट्विटवरुन जोरदार टीका होत असल्याचं लक्षात येताच तस्लीमा नसरीन यांनीही आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरणं दिलं. "मोईन अलीबाबतचं ट्विट विनोद शैलीतून केलं होतं. पण माझ्या विरोधकांनी त्याचा वाद निर्माण केला. माझ्याबद्दल समाजात घृणा निर्माण व्हावी यासाठीच ते प्रयत्न करत आहेत", असं स्पष्टीकरण तस्लीमा नसरीन यांनी दिलं. त्यावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यानं तस्लीमा नसरीन यांच्यावर संताप व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
"तुम्हाला हा खरंच विनोद वाटतो का? कुणीच यावर हसलेलं नाही. तुम्ही स्वत:सुद्धा या विनोदावर हसला नसाल. आता कृपा करुन ते ट्विट आधी डिलीट करुन टाका", असं ट्विट जोफ्रा आर्चरनं केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
आपल्या लेखणीमुळे प्रसिद्ध असलेल्या तस्लीमा नसरीन यांनी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीबाबत एक ट्विट केलं होतं. "मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर तो सीरियात जाऊन ISISचा आतंकवादी झाला असता'', असं वादग्रस्त ट्विट नसरीन यांनी केलं. त्यानंतर सोशल मीडियात एकच गहजब झाला. नसरीन यांच्या विधानावर जोरदार सुरू झाली.
Web Title: ipl 2021 jofra archer strong reply to taslima nasreen on her controversial tweet on moeen ali
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.