Indian Premier League 2021 : सततच्या बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. यापूर्वी अनेक खेळाडूंनी बायो-बबलबाबत तक्रार केली, परंतु काहींनी कौतुकही केलं. पण, सततच्या बायो-बबलमुळे कुटुंबापासून दूर रहावे लागलेल्या खेळाडूंनी आता क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. जोश फिलिप, मिचेल मार्श यांच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूनं IPL 2021मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचा फटका महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघाला बसला आहे.
सलग ३३ सामन्यांत नाबाद राहण्याचा विक्रम
CSKच्या या साडेसहा फूट उंचीच्या खेळाडूच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सलग ३३ सामन्यांत नाबाद राहण्याचा विक्रम आहे. त्यानं IPL २०२० तीन सामन्यांत एक विकेट घेतली होती. चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!
कोण आहे हा खेळाडू ?
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड ( Josh Hazlewood ) यानं आगामी आयपीएल २०२१मधून माघार घेतली आहे. ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत ३० वर्षीय गोलंदाज बायो-बबलमध्ये होता. त्यामुळे आता मानसिक आणि शारीरिक कणखर बनवण्यासाठी स्वतःला वेळ देण्याचा त्यानं निर्णय घेतला आहे. १ एप्रिलला हेझलवूड भारतात येणार होता. ''१० महिने बायो-बबलमध्ये व क्वारंटाईन मध्ये होतो. त्यामुळे मी क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढील दोन महिने ऑस्ट्रेलियात घरच्यांना वेळ देण्याचं मी ठरवले आहे,''असे हेझलवूडनं सांगितले. खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!
तो पुढे म्हणाला,''पुढे व्यग्र आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आहेच. वेस्ट इंडिजचा दौरा, त्यानंतर बांगलादेशमध्ये ट्वेंटी-२० मालिका, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, अॅशेस असे १२ महिने क्रिकेट आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न आहे.''
Web Title: IPL 2021 : Josh Hazlewood pulls out of IPL 2021 with Chennai Super Kings due to bubble fatigue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.