IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सला ( DC) ५ बाद १३५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. आयपीएल २०२१मधील मागील काही सामन्यांत अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांची बरीच चर्चा रंगली आणि आजच्या Qualifier 2 मध्येही असेच घडले. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर दिल्लीचा फलंदाज शिमरोन हेटमायर याची शुबमन गिलनं अफलातून कॅच घेतली. त्यानंतर हेटमायर सीमारेषेबाहेरही केला, परंतु तिसऱ्या अम्पायरनं वरुणनं नो बॉल टाकल्याचा निर्णय दिला अन् हेटमायर पुन्हा फलंदाजीला आला. पण, तो नो बॉल होता की नाही, यावरून वाद निर्माण झाला आहे.
श्रेयस अय्यर व रिषभ पंत याच्या आधी मार्कस स्टॉयनिसला फलंदाजीला पाठवण्याचा DCचा निर्णय फसला. स्टॉयनिस काही कमाल करू शकला नाहीच, पण धावा कमी होण्याच्या दडपणाखाली अय्यर, रिषभ, शिमरोन हेटमायर हेही अपयशी ठरले. सलामीवीर पृथ्वी शॉ याला १८ धावा करता आल्या. मार्कस स्टॉयनिस ( १८), शिखर धवन ( ३६), रिषभ पंत ( ६), शिमरोन हेटमायर ( १७) यांना मोठी खेळी करता आली नाही. शाकिबनं ४ षटकांत २८ धावा दिल्या.
शिमरोन हेटमायरनं ( ३) टोलवलेला चेंडू शुबमन गिलनं अफलातून रितीनं टिपला, परंतु चक्रवर्थीनं टाकलेला तो चेंडू नो बॉल असल्यानं त्याला जीवदान मिळाले. चक्रवर्थीनं ४ षटकांत २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. हेयमायर जीवदान मिळूनही केवळ १४ धावा जोडून धावबाद झाला. दिल्लीला २० षटकांत कशाबशा ५ बाद १३५ धावाच करता आल्या. सुनील नरीननं ४ षटकांत २७ धावा दिल्या, तर ल्युकी फर्ग्युसननं २६ धावांत १ विकेट घेतली. अय्यर ३० धावांवर नाबाद राहिला.