IPL 2021, KKR vs DC T20 Live Score : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर संघाबाहेर केला गेलेल्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी कोणतीच कसर सोडताना दिसत नाही. विजय हजारे ट्रॉफीत ८००+ धावा करणारा पहिला भारतीय फलंदाजाचा मान पटकावून इतिहास रचणाऱ्या पृथ्वीनं आज कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीनं ४१ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ४, ४, ४, ४, ४, ४; पृथ्वी शॉनं इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला!
दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पहिल्याच षटकात धमाका उडवून दिला. शिवम मावीच्या त्या षटकात पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं पुढील सहा चेंडूंत सलग सहा चौकार खेचले. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय धावांचा पाठलाग करतानाही असा पराक्रम कोणत्याच फलंदाजानं केला नव्हता. याआधी अजिंक्य रहाणेनं २०१२मध्ये एका षटकात सलग सहा चौकार खेचले होते. पहिल्या षटकात सर्वाधिक २४ धावांचा विक्रमही पृथ्वीनं नावावर केला. Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!
पृथ्वीनं ही आतषबाजी अशीच सुरू ठेवताना १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि यंदाच्या आयपीएलमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठऱलं. ( Prithvi Shaw registers fastest fifty of #IPL2021 in 18 balls) दिल्ली कॅपिटल्सकडून १८ चेंडूंत रिषभ पंतनंतर अर्धशतक करणारा पृथ्वी पहिलाच फलंदाज ठरला. पृथ्वीची मंत्रमुग्ध फटकेबाजी पाहताना शिखर धवनचा संयमी खेळही मन जिंकून घेत होता. १४व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. पॅट कमिन्सनं ४६ धावांवर खेळणाऱ्या धवनला पायचीत केलं अन् पृथ्वीसोबतची पहिल्या विकेटसाठीची भागीदारी १३२ धावांवर संपुष्टात आली. DCला विजयासाठी २३ अन् पृथ्वीला शतकासाठी १८ धावा हव्या होत्या. पण, रिषभ पंतनं ताबडतोड फटकेबाजी करून DCला विजय मिळवून देण्यात जराही विलंब केला नाही. १६व्या षटकात कमिन्सनं DCचा स्टार पृथ्वीला बाद केले, नितीश राणानं अफलातून झेल घेतला. दिल्लीनं १६.३ षटकांत ३ बाद १५६ धावा करताना विजय पक्का केला. ऐकावं ते नवलंच; CSKच्या सदस्यानं अज्ञात व्यक्तिचा ऑक्सिजन सिलेंडर एअरपोर्टवरून उचलला अन् भलताच गोंधळ झाला!
प्रथम फलंदाजीला आलेल्या KKRचे नितीश राणा ( १५), राहुल त्रिपाठी ( १९) , कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) हे फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. १५ षटकांत KKRनं ५ बाद ९५ धावा केल्या असताना मैदानावर आंद्रे रसेल व दिनेश कार्तिक ही सर्वात अनुभवी जोडी फटकेबाजी करताना दिसली. पण, १७व्या षटकात अक्षर पटेलच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कार्तिक ( १४) बाद झाला. आंद्रे रसेल व पॅट कमिन्स यांनी संघर्ष करताना KKRला २० षटकांत ६ बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. पॅट कमिन्सनं ११ धावा केल्या.