IPL 2021, KKR vs DC T20 : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं एकट्यानं कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. पृथ्वीनं पहिल्या षटकातच सॉलिड सुरूवात केली आणि शिवम मावीला सहा चेंडूंत सहा चौकार खेचले... पृथ्वीनं ही फटकेबाजी कायम राखताना दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) चा विजय पक्का केला. त्यानं शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी करताना ४१ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. शिवम मावीनं या सामन्यानंतर पृथ्वी शॉची मान पकडली अन् त्याचा हात मुरगळला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जबरदस्त, खणखणीत...! पृथ्वी शॉ सॉलिड खेळला; जलद अर्धशतक नोंदवत दिल्लीला सहज विजय मिळवून दिला
आज शुबमन गिल फॉर्मात आला पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. नितीश राणा ( १५), राहुल त्रिपाठी ( १९) , कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) हे फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. आंद्रे रसेल पुन्हा संकटमोचकाच्या भूमिकेत होता आणि त्यानं त्याची जबाबदारी चोख पार पाडली. त्यानं KKRला २० षटकांत ६ बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. अमित मिश्रासारखा अनुभवी व फॉर्मात असलेला गोलंदाज दुखापतीमुळे बाकावर बसल्यानंतर कोणत्याची संघाची गोलंदाजीची बाजू डळमळली असती. पण, अक्षर पटेल व ललित यादव यांनी डावच पालटला. ललितनं KKRच्या दोन मोठ्या फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही.
सामन्यानंतर काय घडले?