ipl 2021 t20 KKR vs PBKS live match score updates Ahmedabad : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR ) गोलंदाजांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दमदार कामगिरी केली. पंजाब किंग्सची ( PBKS) शतकी पल्ला गाठतानाही दमछाक झाली. आजच्या सामन्यात फॅबियनच्या जागी अंतिम ११मध्ये संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डननं अखेरच्या षटकांत दमदार फटके मारून पंजाबला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जॉर्डननं १८ चेंडूंत ३० ( १ चौकार व ३ षटकार) धावा कुटल्या. IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update
चेन्नई व मुंबई या शहरांचा टप्पा पूर्ण करून संघ दिल्ली व अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) अहमदाबाद येथील टप्प्याला आजपासून कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स यांच्या लढतीनं सुरुवात झाली. पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) असा सामना येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. IPL 2021, IPL 2021 latest news, KKR vs PBKS IPL Matches
लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी PBKS सावध सुरूवात करून दिली. पण, अवघ्या सहा धावांत त्यांनी तीन प्रमुख खेळाडू गमावले. ० बाद ३६ वरून त्यांचा संघ ३ बाद ४२ असा गडगडला. लोकेश ( १९), ख्रिस गेल ( ०) व दीपक हुडा ( १) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स, शिवम मावी व प्रसिद्ध कृष्णा यांनी बाद केले. पहिल्या दहा षटकांत पंजाबला ३ बाद ५६ धावा करता आल्या. KKR vs PBKS T20 Match, KKR vs PBKS Live Score
सुनील नरीननं १२व्या षटकात पंजाबची सेट जोडी तोडली. राहुल त्रिपाठीनं अफलातून झेल घेत मयांक अग्रवालला ( ३१) माघारी पाठवले. १४व्या षटकात नरीननं मोईजेस हेन्रीक्सचा ( २) त्रिफळा उडवला. निकोलस पूरन व शाहरुख खान पंजाबला मोठी मजल मारून देतील असे वाटले होते. पण, पूरन ( १९) वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. शाहरूखला ( १३) प्रसिद्ध कृष्णानं मागे धाडले. नरीननं २२ धावांत २, वरुण चक्रवर्थी ( १-२४) व शिवम मावी ( १-१३) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पॅट कमिन्सनही दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्घनं तीन विकेट्स घेतल्या. पंजाबनं ९ बाद १२३ धावा केल्या.
Web Title: IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update : Chris Jordan, 30 from just 18 balls, PBKS have made just 123/9 off their 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.