ipl 2021 t20 KKR vs PBKS live match score updates Ahmedabad : कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघानं सलग चार पराभवांनंतर अखेर विजयाची चव चाखली. पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्धच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना KKRच्या फलंदाजांनी माती खाल्ली होती, परंतु राहुल त्रिपाठी व कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी यावेळी KKRची मान खाली पडू दिली नाही. ३ बाद १७ धावांवरून KKRनं डाव सावरताना विजय मिळवला. IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update
लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी PBKS सावध सुरूवात करून दिली. पण, अवघ्या सहा धावांत त्यांनी तीन प्रमुख खेळाडू गमावले. ० बाद ३६ वरून त्यांचा संघ ३ बाद ४२ असा गडगडला. लोकेश ( १९), ख्रिस गेल ( ०) व दीपक हुडा ( १) हे झटपट बाद झाले. त्यानंतर सुनील नरीन ( २-२२), प्रसिद्ध कृष्णा ( ३-३०), पॅट कमिन्स ( २-३१) यांनी पंजाब किंग्सला धक्के दिले. वरुण चक्रवर्थी ( १-२४) व शिवम मावी ( १-१३) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आजच्या सामन्यात फॅबियनच्या जागी अंतिम ११मध्ये संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डननं अखेरच्या षटकांत दमदार फटके मारून पंजाबला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जॉर्डननं १८ चेंडूंत ३० ( १ चौकार व ३ षटकार) धावा कुटल्या. KKR vs PBKS, KKR vs PBKS live score, IPL 2021
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना KKRची सुरुवातही फार चांगली झाली नाही. शुबमन गिल (९), नितीश राणा ( ०) व सुनील नरीन ( ०) हे तीन फलंदाज १७ धावांवर माघारी परतले. रवी बिश्नोईनं सीमारेषेनजीक नरीनचा अप्रतिम झेल घेतला. ४५ वर्षीय ख्रिस गेलनंही क्षेत्ररक्षणात चपळता दाखवताना राहुल त्रिपाठीला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण, त्रिपाठी वेळेत माघारी परतला होता. सुपर कॅच घेणाऱ्या बिश्नोईनं त्यानंतर दोन चौकार सोडले. पंजाबच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या. त्याचाच फायदा उचलत कर्णधार इयॉन मॉर्गन व त्रिपाठी यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.IPL 2021 latest news, KKR vs PBKS IPL Matches
दीपक हुडानं ११व्या षटकात ही भागीदारी तोडली. त्रिपाठी ३२ चेंडूंत ७ चौकारांसह ४१ धावांवर माघारी परतला. KKRला अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी २६ धावाच करायच्या होत्या अन् मॉर्गन व आंद्रे रसेल संयमानं खेळ करत होते. पण, एक धाव चोरण्याचा मोह रसेलला आवरता आला नाही अन् अर्षदीपच्या डायरेक्ट हिटनं त्याला धावबाद होऊन माघारी जावं लागलं. KKRचे फलंदाज उगाच घाई करताना पाहायला मिळाले. पण, मॉर्गन आत्मविश्वासानं खेळताना दिसला अन् अखेरपर्यंत खेळपट्टीवर चिकटून त्यानं KKRला विजय मिळवून दिला. KKR नं हा सामना ५ विकेट्स व २० चेंडू राखून जिंकला. मॉर्गन ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर, तर दिनेश कार्तिक १२ धावांवर नाबाद राहिला. KKR vs PBKS T20 Match, KKR vs PBKS Live Score, IPL 2021 KKR vs PBKS, KKR vs PBKS Live Match
Web Title: IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update : KKR end their losing streak, Finally. beat Punjab Kings by 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.