चेन्नई व मुंबई या शहरांचा टप्पा पूर्ण करून संघ दिल्ली व अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) अहमदाबाद येथील टप्प्याला आजपासून कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स यांच्या लढतीनं सुरुवात होत आहे. तीन सामन्यांनंतर पराभवाची मालिका खंडित करणारा पंजाब किंग्स ( Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ( Kolkata Knight Riders) यांच्यात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update
मुंबईतील अखेरच्या सामन्यात PBKSनं शुक्रवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ९ विकेट्सने विजय मिळवला. KKRला गेल्या चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाबची फलंदाजी मजबूत असून, कर्णधार लोकेश राहुलचा संघातर्फे कामगिरीत सातत्य राखणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद ६० धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाच सामन्यांतील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालही चांगल्या फॉर्मात आहे, तर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मुंबईविरुद्ध नाबाद ४३ धावांची खेळी करीत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. घरबसल्या आयपीएलचे सर्व अपडेट्स मिळवा अन् सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन बक्षीस जिंका
कोलकाता नाईट रायडर्स - नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सुनील नरीन, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्थी ( Kolkata Knight Riders (Playing XI): Nitish Rana, Shubman Gill, Rahul Tripathi, Sunil Narine, Eoin Morgan(c), Dinesh Karthik(w), Andre Russell, Pat Cummins, Shivam Mavi, Prasidh Krishna, Varun Chakravarthy)
पंजाब किंग्स - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, शाहरुख खान, मोईजेस हेन्रीक्स, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्षदीप सिंग ( Punjab Kings XI: KL Rahul, M Agarwal, C Gayle, N Pooran, D Hooda, S Khan, M Henriques, R Bishnoi, M Shami, C Jordan, A Singh)