IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा अपयशाचा पाढा वाचला. कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांसमोर त्यांनी माना टाकल्या. युवा खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा हेतू चांगला होता, परंतु याच खेळाडूंनी त्यांना तोंडघशी पाडले. संघातील अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर हे सर्व प्रेक्षकांमध्ये बसून पाहत होता.
हैदराबादला साजेशी सुरुवात करता आली नाही. पदार्पणात धुरळा उडवणारा जेसन रॉय सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. चांगल्या टचमध्ये असलेल्या वृद्धीमान सहाला आज भोपळाही फोडता आला नाही. टीम साऊदीनं त्याची विकेट घेतली. जेसन रॉय ( १०) शिवम मावीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार केन विलियम्सननं काही सुरेख फटके मारताना हैदराबादला तारण्याचा प्रयत्न केला, परंतु अती घाई त्याला नडली. शकिबच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो ( २६) धावबाद झाला अन् हैदराबादची अवस्था ३ बाद ३८ धावा अशी झाली. नशीबानंही हैदराबादकडे पाठ फिरवली असेच वाटत होते.
अभिषेक शर्मा आज तरी काही करेल असे वाटत होते, परंतु शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. दिनेश कार्तिकनं सहज त्याचा यष्टीचीत केलं. अब्दुल समद आला ३ खणखणीत षटकार खेचून २५ धावांत माघारी गेलाही. वरुण चक्रवर्थीनं दोन विकेट्स घेत हैदराबादला कोंडीत पकडले. हैदराबादला ८ बाद ११५ धावा करता आल्या. शिवम मावी व टीम साऊदी यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2021, KKR vs SRH Live Updates : Excellent bowling effort by KKR to restrict SRH for 115 for 8 from 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.