Join us  

IPL 2021, KKR vs SRH T20 Live : तीन सुपर डूपर कॅच अन् SRHनं सामना फिरवला, Manish Pandeyची कॅच पाहून मालकिणबाई खूश झाल्या, Video 

ipl 2021 t20 KKR vs SRH live match score updates  chennai सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचं जबरदस्त कमबॅक, अखेरच्या पाच षटकांत ४२ धावांत घेतल्या पाच विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 9:50 PM

Open in App

IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाच्या यंग ब्रिगेडसमोर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली. शुबमन गिल व नितीश राणा ( Nitish Rana) यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर राहुल त्रिपाठीनं ( Rahul Tripathi) हात धुऊन घेतले. नितीश व राहुलनं अर्धशतकी खेळी करताना SRHच्या गोलंदाजांना हतबल केलं. राहुलनं ५३ धावा चोपल्या. नितीशला शतकानं हुलकावणी दिली. नितीशनं ५६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८० धावा चोपल्या. हे दोघंही माघारी परतल्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. पण, दिनेश कार्तिकनं मॅच फिनिशर इनिंग खेळताना ९ चेंडूंत २२ धावा चोपल्या.  IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update

सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचं जबरदस्त कमबॅक, अखेरच्या पाच षटकांत ४२ धावांत घेतल्या पाच विकेट्स घेतल्या. या सामन्यात KKR दोनशेपार धावा करतील असेच चित्र होते, पण मनीष पांडे, अब्दुल समद व वृद्धीमान सहा यांनी अफलातून झेल घेत सामनाच फिरवला. IPL 2021 KKR vs SRH Live T20 Score

पाहा व्हिडीओ...

नितीश-शुबमनची सॉलिड सुरूवातKKR नं नितीश राणा व शुबमन गिल या जोडीला सलामीला उतरवले. राणानं पहिल्या पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करताना शुबमन सह ५० धावा चोपल्या. यापैकी ३६ धावा या नितीशच्या होत्या. ही जोडी तोडण्यासाठी SRHनं राशिद खानला पाचारण केलं आणि त्यानं शुबमनला ( १५) बाद करून यश मिळवून दिलं. अम्पायरनं बाद देऊ नये म्हणून Nitish Rana नं दाखवली बॅट, जाणून घ्या नेमकं काय झालं

राहुल त्रिपाठीने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानं २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या. नितीश व राहुल यांची ५० चेंडूंत ९० धावांची भागीदारी टी नटराजननं तोडली. त्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. मोहम्मद नबीनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेत नितीश व इयॉन मॉर्गन यांना माघारी पाठवले. KKRला २० षटकांत ६ बाद १८७ धावांवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स