IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update : माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ( Sunrisers Hyderabad) नितीश राणा व शुबमन गिल या जोडीला सलामीला उतरवले. राणानं पहिल्या पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करताना शुबमन सह ५० धावा चोपल्या. यापैकी ३६ धावा या नितीशच्या होत्या. ही जोडी तोडण्यासाठी SRHनं राशिद खानला पाचारण केलं आणि त्यानं शुबमनला ( १५) बाद करून यश मिळवून दिलं. पुढच्याच षटकात नितीश राणालाही त्यानं बाद करण्यात जवळपास यश मिळवलं होतं, परंतु अम्पायरला निर्णय बदलावा लागला. IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update पृथ्वी शॉच्या फलंदाजीवर अभिनेत्री फिदा; दिल्लीच्या फलंदाजाला दिलं 'हृदय'!
Hat-trick of fours! 👌👌
Nitish Rana takes on Sandeep Sharma and creams three successive fours. 👏👏 #VIVOIPL #SRHvKKR vivo Kolkata Knight Riders
Watch all the 3⃣ fours 🎥👇
Posted by IPL - Indian Premier League on Sunday, April 11, 2021
आयपीएलचे जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीनही संघाकडून खेळणारा हरभजन सिंग हा पहिलाच खेळाडू ठरला. आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्यानंतर भज्जी पहिला ट्वेंटी-२० सामना खेळत आहे. ६९९ दिवसांनी तो मैदानावर उतरला आहे. IPL 2021 : सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका नितीश राणानं का दाखवली बॅट?डावाच्या ९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राशिदच्या गोलंदाजीवर नितीश राणानं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा हा प्रयत्न फसला. चेंडू पॅडला लागल्यानं राशिदनं LBW ची अपील केली आणि मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. पण, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी त्याचा बॅटीशी संपर्क आला होता, असे नितीश राणा बॅट दाखवून इशाऱ्यानं सांगत होता. मैदानावरील पंचांनी बाद देताच नितीशनं त्वरीत DRS घेतला आणि तो नाबाद असल्याचा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिली.( Nitish Rana showing the bat to the umpire on that LBW decision )
Playing XISRH परदेशी खेळाडू - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, राशिद खानKKR परदेशी खेळाडू - पॅट कमिन्स, आंद्रे रसेल, इयॉन मॉर्गन, शाकिब अल हसन
Sunrisers Hyderabad : डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजनKolkata Knight Riders: शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्थी