Join us  

IPL 2021: सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक - गौतम गंभीर

गंभीर म्हणाला, सूर्यकुमार यादवला संघातून काढून टाकणे ही केकेआरची मोठी चूक होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:25 AM

Open in App

नवी दिल्ली : गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव उपकर्णधार होता. २०१८ मध्ये सूर्यकुमारला केकेआरने रिलिज केले. आता तो मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला. केकेआरच्या या निर्णयाला गंभीरने १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, असे संबोधले आहे. खासदार असलेला गंभीर आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत आहे. यंदा केकेआरला चार पराभवाला सामोरे जावे लागले. 

गंभीर म्हणाला, सूर्यकुमार यादवला संघातून काढून टाकणे ही केकेआरची मोठी चूक होती. सूर्यकुमार यादवने २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यावर्षी एकमेव सामना खेळण्याची संधी मिळाली.  २०१४ ला तो केकेआरमध्ये आला.  चार वर्ष  खेळविल्यानंतर त्याला रिलिज करण्यात आले. २०१८ ला  मुंबई इंडियन्सने ३.२ कोटी रुपयाच्या बोलीसह सूर्याला संघात घेतले. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मुंबईच्या विजयात त्याने अनेकदा मोलाची भूमिका बजावली.

ईयोन  मॉर्गनच्या नेतृत्वात केकेआरने यंदा एक सामना जिंकला आहे. गंभीर म्हणाला, ‘जर भारतीय कर्णधार असता, तर लोकांनी त्याच्यावर टीका केली असती.’ गंभीरचे विधान दिनेश कार्तिकशी संबंधित होते. कार्तिकने २०२० मध्ये केकेआरच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कार्तिकने दडपणामुळे कर्णधारपद सोडले होते, अशी चर्चा होती.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवगौतम गंभीर