IPL 2021 मध्ये सर्वात आधी कोरोनानं कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) बायो बबल भेदला. KKRचा वरुण चक्रवर्थी (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर्स (Sandeep Warriers) यांचा कोरोना रिपोर्ट सर्वातआधी पॉझिटिव्ह आला. बीसीसीआयच्या बेजबाबदारपणामुळे हा कोरोना व्हायरस एका संघातून दुसऱ्या संघापर्यंत पोहोचला आणि हे सर्व मागील आठवड्यात घडले. बीसीसीआयनं खेळाडूंना दिलेल्या जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईसमध्ये बिघाड झाला होता, अशात बीसीसीआयनं मॅन्युअल काँटॅक्ट ट्रेसिंगनं कोरोनाचा बायो बबलमध्ये कसा शिरकाव झाला याचा शोध लावला. TimesNowच्या वृत्तानुसार अहमदाबाद येथे सराव सत्रादरम्यान हा व्हायरस एका संघातून दुसऱ्या संघापर्यंत पोहोचला. अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल
KKR ते DC कसा पोहोचला व्हायरस?
KKRच्या खेळाडूंनंतर सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वरुण चक्रवर्थीला खांद्याच्या स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेले गेले होते. हॉस्पिटलमधून पुन्हा हॉटेलमध्ये परतल्यानंतर वरूणनं १ मे रोजी संदीप वॉरियर्ससोबत जेवण जेवले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकत्र सराव केला. तेथे वरूणच्या प्रकृती बिघाडाची बातमी समोर आली. अशात मसाजरच्या रुममध्ये त्याला आयसोलेट केले गेले, परंतु संदीप सरावाला गेला. तिथे दिल्ली कॅपिटल्सचे सराव सत्र सुरू होते. फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना यांच्यावरही कोरोना संकट?; CSKच्या गोटातून समोर आली धक्कादायक बाब!
या सराव सत्रात संदीप आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रा यांची भेट झाली. दोघंही बराच काळ एकमेकांशी चर्चा करत होते. सराव सत्रानंतर जेव्हा अमित मिश्रा हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा त्यानं प्रकृती बिघडल्याचे फ्रँचायझीला कळवले. त्यानंतर त्याला लगेच आयसोलेट केले गेले.
Web Title: IPL 2021 : Kolkata Knight Riders to Delhi Capitals: How COVID-19 infection could've travelled between two franchises
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.