IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. ( Lalit Modi Wants BCCI to Pledge 'Rs 700-800 Crores' From IPL Earnings Towards Fight Against COVID-19)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 07:47 PM2021-05-03T19:47:33+5:302021-05-03T19:48:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Lalit Modi says BCCI should donate "Rs 700-800 Crores" from IPL earnings to COVID-19 battle | IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील ८-९ दिवसांपासून दररोज साडेतीन लाखांच्या घरात वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण वाढत आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरतेनं लोकांना जीव गमवावा लागत आहे. अशात पॅट कमिन्स, ब्रेट ली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, शेल्डन जॅक्सन, अशा अनेकांनी पुढे येऊन पुन्हा मदत केली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी ( Lalit Modi) यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. वरुण चक्रवर्थीची एक चूक IPL 2021ला महागात पडणार; तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना?

२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. आयपीएल २०२० व आयपीएल २०२१तून मिळणाऱ्या उत्पन्नातील १० टक्के रक्कम बीसीसीआयनं कोरोनामुळे निधन झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी दान करावेत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. १० टक्के रक्कम म्हणजे ७०० ते ८०० कोटी, हे गणितही मोदींनी समजावून सांगतिले. या रक्कमेतून देशाला खूप मोठी मदत मिळेल. दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स!

Mid Dayशी बोलताना मोदी म्हणाले, मागील दोन वर्षांत आयपीएलमधून केलेल्या कमाईतील १० टक्के रक्कम बीसीसीआयनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी द्यावी. या फॅन्समुळेच भारतात क्रिकेट एवढा मोठा झाला आहे. ही कृती करायची आणि देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे. आयपीएल यापेक्षा अधिक करू शकतं, पण मला हे कळतं नाही त्यांना कोण रोखत आहे. प्रत्येक जीवाचे, प्रत्येक भारतीयाचे आयुष्य महत्त्वाचे आहे. ही वेळ एकजुटता दाखवण्याची व एकत्र येऊन लढण्याची आहे. पॅट कमिन्सनं PM Cares Fundला पैसे देण्याचा निर्णय घेतला मागे; पण, भारताला मदतीचं वचन कायम!

ते पुढे म्हणाले, यापेक्षा अधिक तुम्ही करू शकता. कोरोना लस, ऑक्सिजन, रेस्पिरेटर्स याच्यासाठी आर्थिक मदत करू शकता, तात्पुरते हॉस्पिटल उभे करू शकता. 
 

Web Title: IPL 2021: Lalit Modi says BCCI should donate "Rs 700-800 Crores" from IPL earnings to COVID-19 battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.