सुनील गावसकर, स्ट्रेट ड्राईव्ह
साखळी फेरीत दोन सामन्यांपैकी एक सामना आहे तो कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. याचा हा अर्थ नाही की, चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्याकडे दुर्लक्ष केले जाईल. कारण हे पाहणे देखील नक्कीच रोमांचक आहे की, कोणते संघ पहिल्या दोन स्थानांवर असतील. मात्र, कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामन्यांमुळे सर्वांना कळणार आहे की, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्ली यांच्यासोबत प्ले ऑफमध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल.
जर कोलकाताच्या संघाने विजय मिळवला तर ते प्ले ऑफमध्ये जातील. कारण त्याचा हा अर्थ असेल की मुंबईला त्यांचा सामना अशा नेट रनरेटने जिंकावा लागेल, जो या प्रारूपात शक्य नाही. त्यामुळे अशात मुंबई पात्र ठरणार नाही. मुंबईने राजस्थानविरोधात नक्कीच खूप चांगला खेळ केला. त्यांना फक्त ९० धावांतच रोखले आणि त्यानंतर वेगाने लक्ष्य गाठत आपला नेट रनरेट देखील सुधारला. मात्र मुंबईचा नेट रनरेट हा कोलकातापेक्षा खूपच मागे आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना फक्त राजस्थानला पराभूत करावे लागेल.
राजस्थानने अबुधाबीत अखेरचा सामना खेळला होता. तेव्हा चेन्नईवर शानदार विजय मिळवला होता. त्यांना त्या विजयातून प्रेरणा घ्यावी लागेल. हे दिसते तेवढे नक्कीच सोपे नाही. कोलकाताची ताकद ती आठ षटके आहेत. जी त्यांचे मिस्ट्री बॉलर करतात, सुनील नरेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. तो फलंदाजांना फटकेबाजी करण्याची संधीच देत नाही. तर वरुण दुसरा सोबतच गोलंदाजीतील विविधतेमुळे फलंदाजांना गोंधळात टाकतो. त्यामुळे त्याला हे समजत नाही की, कोणता चेंडू वळणार आहे आणि कोणता सरळ राहील. दोघांनी हे दाखवून दिले आहे की, जास्त चेंडू वळवण्याची गरज नाही, तर फलंदाजाला तुम्ही काही इंच चेंडू वळवून देखील चकवू शकता.
टीम साऊदीने केलेली गोलंदाजी आणि जर शिवम मावीने देखील लयीत गोलंदाजी केली, तर संघाकडे चार आघाडीचे गोलंदाज असतील. सध्या कोलकाताला आंद्रे रसेलची उणीव जाणवत आहे. मॉर्गन हा पाचव्या गोलंदाजांच्या रूपाने अय्यर आणि नितीश राणा यांचा उपयोग करण्यास दोन वेळा नक्कीच विचार करेल. राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या कुलदीप याने खूपच प्रभावित केले. चेन्नईने जर विजय मिळवला तर तो संघ अव्वल दोनमध्ये असेल. अशात अखेरच्या दिवशी होणारा दिल्ली विरुद्ध बंगळुरू हा सामना दुसऱ्या स्थानासाठी होईल. यामुळेच ही स्पर्धा सर्वात रोमांचक आहे. त्यात अखेरच्या दिवशी अखेरचा सामनादेखील ‘करो अथवा मरो’ असा असतो.