IPL 2021, MI vs CSK: कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन बलाढ्य संघांमधील लढतीनं स्पर्धेची सुरुवात होतेय. दोन्ही संघ लढतीसाठी सज्ज असून चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं आक्रमक रुप नेट्समध्ये पाहायला मिळालं आहे.
बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?
मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीनं सरावावेळी आपल्या दमदार फलंदाजीचा जलवा दाखवत इरादा स्पष्ट केला आहे. धोनीनं सराव सामन्यात तब्बल ८ खणखणीत षटकार ठोकले आहे. त्यामुळे धोनीचा जलवा आजच्या सामन्यात पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. धोनीचा सराव सामन्यांमधील फॉर्म पाहता प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चिंता वाढणार आहे.
मागील वर्षी चेन्नई सुपरकिंग्ज संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक पाहायला मिळाली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षात धोनी ब्रिगेडनं दमदार सुरुवात करत स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. चेन्नईचा संघ यंदा पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळत होता. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला होता. पण आता उर्वरित ३१ सामने आजपासून यूएईमध्ये खेळविण्यात येणार आहेत.
धोनीनं सरावादरम्यान कधी फिरकी तर कधी वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धोनीनं सराव सामन्यात ८ खणखणीत षटकार ठोकले. याचा व्हिडिओ चेन्नई सुपरकिंग्जनं ट्विट केला आहे. धोनीनं ठोकलेल्या षटकारांमध्ये एका हेलिकॉप्टर शॉटचा देखील समावेश होता. त्यामुळे धोनी आपल्या पूर्वीच्याच रुपात परतल्याचं पाहायला मिळत आहे. आता प्रत्यक्ष सामन्यात धोनी काय कमाल करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.