Join us  

IPL 2021, MI vs CSK, Live: मुंबईनं नाणेफेक जिंकली अन् दोन जबरदस्त बदल केले; CSKची फलंदाजी, जाणून घ्या Playing XI

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात लढत होतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 6:58 PM

Open in App

IPL 2021, MI vs CSK, Live Score and Updates: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात लढत होतेय. आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघांमध्ये या दोन संघांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे मुंबई विरुद्ध चेन्नईची लढत म्हटलं की क्रिकेट रसिकांसाठी थरारक सामन्याची पर्वणीच ठरते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याची नाणेफेक   जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 

अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत

मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यासाठी दोन मोठे आणि महत्वाचे बदल केले आहेत. मराठमोठा गोलंदाज धवल कुलकर्णी आणि अष्टपैलू जिमी निशम यांना संधी देण्यात आली आहे. संघातून जयंत यादव आणि नेथन कुल्टर नाइल यांना बाहेर बसविण्यात आलं आहे. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जनं संघात कोणताही बदल केलेला नाही. 

चढ-उतारांचा अनुभव घेत असलेला मुंबई इंडियन्स संघ आपली मोहीम योग्य मार्गावर आणण्यासाठी आतुर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा विजयी रथ रोखण्यास मुंबई इंडियन्सचा संघ प्रयत्नशील असेल. यूएईमध्ये गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर सीएसके यावेळी बदललेल्या निर्धारासह मैदानात उतरला आहे आणि पहिली लढत गमावल्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले आहेत. सध्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल स्थानी आहे.

संघ

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जिमी निशम, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी

चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)ऋतूराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, मोइन अली, अंबाती रायुडू, एम एस धोनी (कर्णधार), सॅम कुरन, लुंगी निगीडी, शार्दुल ठाकूर, दिपक चहर 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मामहेंद्रसिंग धोनी