Join us  

IPL 2021, MI vs CSK, Live: पोलार्डच्या रौद्ररुपात चेन्नईचा धुव्वा! रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४ विकेट्सनं विजय

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज कायरन पोलार्ड नावाच्या रौद्ररुपी वादळात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा धुव्वा उडाला. चेन्नई सुपरकिंग्ज संघानं दिलेलं कडवं २१८ धावांचं आव्हान मुंबई इंडियन्सनं ४ विकेट राखून गाठलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 11:37 PM

Open in App

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज कायरन पोलार्ड नावाच्या रौद्ररुपी वादळात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा धुव्वा उडाला. चेन्नई सुपरकिंग्ज संघानं दिलेलं कडवं २१८ धावांचं आव्हान मुंबई इंडियन्सनं ४ विकेट राखून गाठलं. मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्ड यानं आपणच टी-२० चा 'बॉस' असल्याचं यावेळी दाखवून दिलं. पोलार्डनं अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्स संघासाठी विजय खेचून आणला. (IPL 2021 MI vs CSK Pollards not out 87 helps Mumbai win by four wickets)

मुंबई इंडियन्सनं आजच्या विजयानं आयपीएलच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं आजपर्यंत दोनशे धावांच्यावरील आव्हान गाठण्यात कधीच यश आलं नव्हतं. पण आज कायरन पोलार्डनं ही कमतरता देखील भरुन काढली आहे. कायरन पोलार्डनं तब्बल २५५ च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करत ८ उत्तुंग षटकार आणि ६ खणखणीत षटकार लगावले. पोलार्डनं त्याचं अर्धशतक अवघ्या १७ चेंडूत पूर्ण केलं. यंदाच्या आयपीएलमधील हे आतापर्यंतचं सर्वात जलद अर्धशकत ठरलं आहे.

कायरन पोलार्ड वगळता मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डी कॉक यानं ३८ धावांचं, तर कर्णधार रोहित  शर्मा यानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर कृणाल पंड्यानं पोलार्डला चांगली साथ देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. कृणालनं ३२ धावांची खेळी साकारली. तर हार्दिक पंड्यानं ७ चेंडूत १६ धावांचं योगदान दिलं. 

सामन्याची नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. चेन्नईनं दमदार सुरुवात करत तुफान फलंदाजी केली. वीस षटकांच्या अखेरीस चेन्नईनं ४ बाद २१८ धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडू यानं अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करत संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला होता. रायुडूनं अवघ्या २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. तर फॅफ ड्यू प्लेसिसनं २८ चेंडूत ५० धावा, तर मोइन अलीनं ३६ चेंडूत ५८ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स