Join us  

IPL 2021, MI vs CSK: नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण? 

IPL 2021, MI vs CSK: स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असताना मुंबईच्या संघानं दोन महत्त्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर का बसवलं यामागचं कारण समोर आलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 8:14 PM

Open in App

IPL 2021, MI vs CSK: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यानं आयपीएलच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पण पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दोन धक्के दिले आहेत. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईचं नेतृत्त्व आज कायरन पोलार्डकडे देण्यात आलं आहे. पण स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असताना मुंबईच्या संघानं दोन महत्त्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर का बसवलं यामागचं कारण समोर आलं आहे. 

मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर

आजच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी चेन्नईचा सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबत मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कायरन पोलार्ड मैदानात आल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा कुठंय असा प्रश्न सर्वांना पडला. नाणेफेकीवेळी कायरल पोलार्ड यालाही याबाबत विचारण्यात आलं असता रोहितच्या प्रकृतीबाबत पोलार्डनं सविस्तर माहिती दिली नाही. 

'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा...

"आम्हाला रोहितची चिंता नाही. तो आज नाही तर उद्या नक्कीच फीट होईल आणि संघात पुनरागमन करेल. आजच्या सामन्यासाठी मी संघाचं नेतृत्त्व करत आहे", असं कायरन पोलार्ड म्हणाला. त्यामुळे केवळ आजच्या सामन्यासाठी रोहित शर्माला आराम देण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

आजच्या सामन्याला सुरुवात होण्याआधी रोहित शर्मा मैदानात वॉर्मअप करताना देखील दिसला होता. पण कायरन पोलार्ड नाणेफेकीसाठी मैदानात येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दुसरीकडे पोलार्डनं आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या देखील खेळणार नसल्याचं यावेळी सांगितलं. त्यामुळे पंड्या देखील सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नसल्याचं म्हटलं जात आहे. पंड्याच्या पाठीच्या दुखापतीवर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतरही त्यानं संघात पुनरागमन केलं होतं. पण आजच्या सामन्यात पंड्याला आराम देण्यात आलेला असल्यानं त्याच्या फिटनेसबाबत अजूनही साशंकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१रोहित शर्माहार्दिक पांड्याचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App