ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अमित मिश्राला ( Amit Mishra) आज खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) फलदायी ठरला. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. IPL 2021 : MI vs DC T20 Live Score Update
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला. मार्कस स्टॉयनिसनं तिसऱ्या षटकाट क्विंटनला ( १) माघारी पाठवले. रोहित व सूर्यकुमार यादव फटकेबाजी करत होते. रोहित व सूर्यकुमार यादव या दोघांनी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. आवेश खाननं ही भागीदारी तोडली. सूर्यकुमार यादव १५ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्मांजीसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!
रोहितचे वादळ रोखण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं आज अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याला खेळवले. त्यानं दुसऱ्याच षटकात मोठा पराक्रम केला. अमितनं MIचा कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना एकाच षटकात माघारी पाठवले. रोहितनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. हार्दिक भोपळ्यावर गेला. ललित यादवच्या आतमध्ये येणाऱ्या चेंडूला कट करण्याचा चुकीचा प्रयत्न कृणाल पांड्याला महागात पडला अन् मुंबईचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्ड आज पुन्हा एकदा MIचा तारणहार ठरेल असे वाटले होते, परंतु अमित मिश्रानं त्याला गुगलीवर LBW केले. १ बाद ६७वरून मुंबईची अवस्था ६ बाद ८४ अशी झाली. IPL 2021 latest news, MI vs DC IPL Matches
१८व्या षटकात अमित मिश्राचे अखेरचं षटक रिषभ पंतनं टाकून घेतलं. त्यातही मिश्रानं सुरेख यॉर्कर टाकून MIचा सेट फलंदाज इशान किशनला ( २६) त्रिफळाचीत केलं. मिश्रानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. इशाननं सातव्या विकेटसाठी जयंत यादवसह ३९ धावांची भागीदारी केली, परंतु यादवही ( २३) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर समाधान मानावे लागले. IPL 2021 MI vs DC, MI vs DC Live Match
Web Title: IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Amit Mishra took 4 wickets, Mumbai Indians 9/137
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.