IPL 2021, MI vs DC : मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला. अमित मिश्राची उत्तम गोलंदाजी व शिखर धवन, स्टीव्ह स्मिथच्या संयमी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. दुखापतीमुळे रोहित शर्मानं मैदान सोडल्यानंतर किरॉन पोलार्डनं MI चे नेतृत्व सांभाळले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला मोठा धक्का बसला आहे. IPL 2021, MI vs DC T20 : मुंबई इंडियन्सनं सामना गमावला, पण किरॉन पोलार्डनं मन जिंकलं; वाचा त्यानं काय केलं!
प्रथम फंलदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( २४), इशान किशन ( २६) व जयंत यादव ( २३) यांनी सुरेख खेळ केला. हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून माघारी परतले. अमित मिश्रानं अनुभव पणाला लावताना मुंबईच्या फलंदाजांना नाचवले. त्यानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. MIविरुद्ध DCच्या गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आवेश खाननं २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( ४५), स्टीव्ह स्मिथ ( ३३), ललित यावद ( २२*) आणि शिमरोन हेटमायर ( १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीनं १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले. पराभव, दुखापत यांच्यापाठोपाठ रोहित शर्माला १२ लाखांचा दंड भरावा लागला आहे. षटकांची मर्यादा संथ ठेवल्यामुळे त्याला हा दंड भरावा लागणार आहे. ही त्याची पहिलीच चूक होती, परंतु पुढील सामन्यात त्यानं ही चूक पुन्हा केल्यास नियमानुसार त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होईल. IPL 2021, MI vs DC T20 : Rohit Sharmaला दुखापत, सामना अर्ध्यावर सोडून गेला मैदानाबाहेर; समोर आले मोठे अपडेट्स
पुढील सामने
- २३ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
- २९ एप्रिल, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
- १ मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
- ४ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
- ८ मे, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
- १० मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
- १३ मे, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
- १६ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
- २० मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
- २३ मे, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता