IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : प्रत्येक सामना अखेरच्या षटकापर्यंत नेऊन हुकूमी गोलंदाजांच्या जीवावर जिंकता येतो, हा फाजील आत्मविश्वास मुंबई इंडियन्सला नडला. चुकीचे फटके मारून MIचे स्टार फलंदाज तंबूत परतले अन् दिल्ली कॅपिटल्ससमोर त्यांना १३८ धावांचे माफक लक्ष्यच ठेवता आले. शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, शिमरोन हेटमायर यांनी DCचा विजय पक्का केला. अमित मिश्रानं चार विकेट्स घेत हा सामना गाजवला. दिल्लीनं ६ विकेट्सनं हा सामना जिंकला. या सामन्यात दिल्ली धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेनंतर रोहित शर्मानं मैदान सोडले आणि तो नंतर आलाच नाही. किरॉन पोलार्डनं MIचे नेतृत्व सांभाळले. रोहितच्या मैदान सोडण्यामागे दुखापतीचं कारण समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते काहीसे चिंतेत आहेत. शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय
रोहित शर्मानेच दिले अपडेट्स
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ज्या प्रकारे आम्ही सुरुवात केली होती, ते पाहून मधल्या षटकातही चांगली कामगिरी करू असा विश्वास मला होता, परंतु तसे झाले नाही. पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोगही आम्ही करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला पुन्हा अपयश आलं. दिल्लीच्या गोलंदाजांना श्रेय द्यायला हवं, त्यांनी सातत्यानं दबाव निर्माण केला आणि विकेट्स घेतल्या. दव जास्त असेल याची कल्पना होती. परंतु, मागील काही सामन्यात दवामुळे चेंडूवर ग्रीप पकडण्यास काहीच अडचण आली नाही. विजयासाठी तुम्हाला स्मार्ट क्रिकेट खेळता आलं पाहिजे. माझी दुखापत गंभीर नाही, पुढच्या सामन्यासाठी मी तंदुरूस्त असेन.'' अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video
सामन्यात काय झालं?प्रथम फंलदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( २४), इशान किशन ( २६) व जयंत यादव ( २३) यांनी सुरेख खेळ केला. हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून माघारी परतले. अमित मिश्रानं अनुभव पणाला लावताना मुंबईच्या फलंदाजांना नाचवले. त्यानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. MIविरुद्ध DCच्या गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आवेश खाननं २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video
लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( ४५), स्टीव्ह स्मिथ ( ३३), ललित यावद ( २२*) आणि शिमरोन हेटमायर ( १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीनं १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.