IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update : क्विंटन डी कॉक दोन धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. त्यानं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी चेपॉकवर ९९ मीटर उत्तुंग षटकार खेचला आणि तो पाहून डगआऊटमध्ये उभा असलेला हार्दिक पांड्या स्तब्ध झाला. IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update
या सामन्यात रोहितनं १६वी धाव घेताच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. त्यानं SRHच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाजांत विराट कोहली - ५९११, सुरेश रैना -५४२२, शिखर धवन - ५२८२, रोहित शर्मा - ५२६५* व डेव्हिड वॉर्नर - ५२५७ असे अव्वल पाच खेळाडू आहेत. रोहित थोडासा संथ खेळत होता, तेच दुसरीकडे सूर्याची बॅट तुफान फटकेबाजी करत होता. रोहित-सूर्या जोडीनं ३८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १०व्या षटकात पॅट कमिन्सच्या पाचव्या चेंडूवर सूर्यानं मारलेला षटकार स्टेडियमपार केला. सूर्यानं या षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याचा ९९ मीटरचा हा फटका पाहून डगआऊटमध्ये बसलेला हार्दिक पाड्याही अवाक् झाला. IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update