Join us  

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्मासमोर उभा ठाकलाय मोठा पेच; जाणून घ्या पहिल्या विजयासाठी खेळणार कोणते डावपेच

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:18 PM

Open in App

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. २०१२नंतर MIला आयपीएल पर्वातील पहिला सामना जिंकताच आलेला नाही. त्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे ( Kolkata Knight Riders) आव्हान आहे. KKRनं पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ( १०) धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे MIला KKRचे आव्हान थोपवून लावण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. IPL 2021, IPL 2021 latest news

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात क्विंटन डी कॉकचे आगमन झाले आहे. ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी त्यानं पूर्ण केला आहे. त्याच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात ख्रिस लीन ( Chris Lynn) रोहित शर्मासह सलामीला आला होता. लीननं MI कडून पदार्पणाच्या सामन्यात  ३४ चेंडूंत ४९ धावांची खेळी केली होती. आता क्विंटनचे पुनरागमन झाल्यानं लीनला KKRविरुद्धच्या सामन्यात बाकावर बसवले जाऊ शकते. IPL 2021 MI Vs KKR, MI Vs KKR Live Match

In the #VIVIOIPL season opener & on his debut for Mumbai Indians, Chris Lynn scored a quickfire 49. 👍👍

Will the...

Posted by IPL - Indian Premier League on Tuesday, April 13, 2021
दक्षिण आफ्रिकेचा ६ फुट ८ इंच उंचीच्या मार्को जॅन्सेन यानं RCBविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल व शाहबाज अहमद या दोघांना माघारी पाठवले होते. जसप्रीत बुमराह फॉर्मात दिसला. त्यामुळे मुंबई इंडियन्स गोलंदाजी विभागात फार बदल करतील याची अपेक्षा कमी आहे. ट्रेंट बोल्ट, कृणाल पांड्या व राहुल चहर यांचेही स्थान पक्के आहे. फलंदाजीत क्विंटन डी कॉक व ख्रिस लीन यापैकी एकाची निवड, हाच प्रश्न रोहित शर्मासमोर असणार आहे. MI Vs KKR, MI Vs KKR live score

Head-to-head recordsमुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत २७ सामने झालेत आणि मुंबई इंडियन्सनं २१ सामन्यांत विजय मिळवले आहेत.   

    

➡️ Rohit's massive numbers against KKR➡️ Marco high on confidence after a promising debut

📖 Read about all that and more in the #KKRvMI preview 👇🏻

#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #CricketTogether

Posted by Mumbai Indians on Monday, April 12, 2021
संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

Kolkata Knight Riders: शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्थी, प्रसिद्ध कृष्णा

Mumbai Indians: रोहित शर्मा, ख्रिस लीन/क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जॅन्सेन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सक्विन्टन डि कॉक