Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी फार खास राहिली नाही. २०१३पासून सुरू असलेलं पहिल्या सामन्यातील पराभवाचे सत्र MIनं याही वेळेस कायम ठेवले. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं त्यांना पराभूत केलं. सहावा गोलंदाज म्हणून MIला पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याची उणीव जाणवली. खांद्याच्या दुखापतीतून नुकताच सावरलेला आणि टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या हार्दिकचा वर्क लोड कमी करण्यासाठी त्याच्याकडून अधिक गोलंदाजी करून घेतली जात नाही. अशात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुढील सामन्यात KKR विरुद्ध गोलंदाजी करताना दिसला, तर आश्चर्य वाटायला नको. शाहिद आफ्रिदीचा जावई जसप्रीत बुमराहपेक्षा सरस; विराट vs बाबर तुलना करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची मुक्ताफळं!
मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) पुढील सामना बुधवारी चेन्नईत कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे. मुंबईची पराभवानं सुरूवात झाली असली तरी KKRनं पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर (SRH) विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची बाजू वरचढ नक्कीच असेल. अशात हार्दिकनं KKRविरुद्ध गोलंदाजी न केल्यास रोहित काही षटकं टाकण्याची तयारी करत आहे. रोहितनं नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करून तसे संकेत दिले आहेत. Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी फार खास राहिली नाही. २०१३पासून सुरू असलेलं पहिल्या सामन्यातील पराभवाचे सत्र MIनं याही वेळेस कायम ठेवले
पाहा व्हिडीओ..
हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही? प्रशिक्षक झहीर खाननं आता स्पष्टच सांगितलं...झहीर खाने म्हटले की, ‘एक अष्टपैलू म्हणून हार्दिक आमच्यासाठी पूर्ण पॅकेज आहे. प्रत्येक जण आता कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यास आसुसले आहेत. त्यामुळे संघात नवा आत्मविश्वास संचारला आहे. हार्दिकही खूप मेहनत घेत असून लवकरच सर्वजण त्याला गोलंदाजी करताना पाहतील.’
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जेम्स निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर
Web Title: IPL 2021, MI vs KKR : Rohit Sharma Bowls At Mumbai Indians Nets Ahead Of KKR Clash, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.