नवी दिल्ली: लागोपाठ दोन सामने जिंकत कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR)आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात जोरदार कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवत केकेआर आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत. या दोन्ही विजयात तरुण खेळाडू व्यंकटेश अय्यरचा सिंहाचा वाटा आहे. आरसीबीविरुद्ध २७ चेंडूत ४१ धावा काढणाऱ्या व्यंकटेशनं मुंबईविरुद्ध ३० चेंडूत ५३ धावा चोपून काढल्या.
व्यंकटेश अय्यरनं आक्रमक फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई केली. षटकार ठोकत त्यानं खातं उघडलं. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्न यासारख्या वेगवान गोलंदाजांवर अय्यरनं जबरदस्त हल्ला चढवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ बॅकफूटवर गेला. व्यंकटेशची निडर फलंदाजी गेल्या २ सामन्यांत दिसली. त्यामुळे त्यांचं भविष्य उत्तम असेल, असं अनेकांना वाटू लागलं आहे. पण व्यंकटेशचं भविष्य उज्ज्वलच असणार अशी भविष्यवाणी तो अवघ्या ७ महिन्यांचा असताना झाली होती. MS Dhoniकडून आज हरला तर विराट कोहली 'कामा'तून जाणार; RCB कर्णधारपदावरून काढणार?
टॅक्सी चालकानं केली होती भविष्यवाणीतुमचा मुलगा कुटुंबाचं नाव खूप मोठं करेल, अशी भविष्यवाणी एका टॅक्सी चालकानं केली होती. व्यंकटेशची आई उषा यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत ही आठवण सांगितली. 'त्यावेळी व्यंकटेश अवघ्या ७ महिन्यांचा होता. त्याला घेऊन मी भोपाळहून देवासला जात होते. व्यंकटेशला घेऊन मी पुढच्या सीटवर बसले होते. त्या प्रवासादरम्यान टॅक्सी चालक अनेकदा व्यंकटेशकडे पाहत होता. तुमचा मुलगा खूप मोठं नाव कमावेल, असं तो टॅक्सी चालक आम्ही टॅक्सीतून उतरत असताना म्हणाला होता. त्याला ज्यात गती असेल, ते करू द्या. हा मुलगा भविष्यात आयुष्यात खूप यशस्वी होईल, असं टॅक्सी चालक म्हणाला होता,' अशी आठवण उषा यांनी सांगितली.