ipl 2021 t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानं ( Rohit Sharma) संघात कोणताच बदल न करता क्विंटन डी कॉकसह सलामीला आला. मोईजेस हेन्रीक्सच्या पहिल्या षटकात मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहितसाठी अपील झाली अन् अम्पायर शमसुद्दीन यांनी त्याला बाद दिले. अम्पायरच्या या निर्णयावर रोहितनं नाराजी व्यक्त करताना त्यांच्याकडे हातवारे करून रागात काहीतरी पुटपुटला. त्याच्यावर सामनाधिकारी कोणती कारवाई करतील, हे सामन्यानंतरच कळेल. IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update
रोहित शर्मा आज आयपीएलमधील २००वी इनिंग खेळत आहे आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. ( Most innings batted in IPL) त्यानंतर सुरेश रैना ( १९२), विराट कोहली ( १८८), महेंद्रसिंग धोनी ( १८५) व रॉबीन उथप्पा ( १८२) यांचा क्रमांक येतो. हेन्रीक्सनं टाकलेला चेंडू लेगसाईडला रोहितच्या थायपॅडला आदळून यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेपावला, अम्पायरनं रोहितला बाद दिले आणि त्यानं लगेच DRS घेतला.. MI Vs PBKS, MI Vs PBKS live score, IPL 2021
पंजाब किंग्स ( Punjab Kings XI) - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, मोईसेज हेन्रीक्स, फॅबियन अॅलन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians XI) - क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जयंत यादव, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह IPL 2021 latest news, MI Vs PBKS IPL Matches
पाहा व्हिडीओ..
Web Title: IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Rohit Sharma not impressed with umpire Shamsuddin's decision, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.