Join us  

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : पंजाब किंग्सविरुद्ध रोहित शर्मा तीन मोठे बदल करणार; अपयशी स्टार खेळाडूंना बाकावर बसवणार!

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 4:51 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगणार आहे.  मुंबई इंडियन्स ( MI)  आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, फलंदाजी विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेता MI गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईला चार पैकी दोन सामने जिंकता आले आहेत. मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना हार मानावी लागली होती आणि त्या फलंदाजांनी चुकीचे फटके मारून MIच्या पराभवाचा खड्डा खणला होता. त्या सामन्यातील चुका टाळून मुंबई इंडियन्स आज पंजाबचा ( PBKS) सामना करणार आहे, परंतु रोहित शर्मा आजच्या सामन्यात तीन मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.  IPL 2021 MI Vs PBKS, MI Vs PBKS Live Match

  • स्फोटक फलंदाजी हे बलस्थानच MIची कमकुवत बाजू झालेली पाहायला मिळत आहे.
  • मधल्या फळीतील फलंदाजांकडून हवं तसं योगदान मिळत नाही. 
  • हार्दिक पांड्या गोलंदाजी तर करतच नाही, शिवाय फलंदाजातही तो अपयशी ठरला आहे
  • एकीकडे अन्य संघांचे फिरकीपटू कमाल करताना मुंबई इंडियन्सचा एकच गोलंदाज खिंड लढवतोय

 

तीन बदल कोणते? 

  • इशान किशन किंवा हार्दिक पांड्या यांच्यापैकी एकाला विश्रांती 

सूर्यकुमार यादव व इशान किशन या दोघांनीही गतवर्षीची आयपीएल स्पर्धा गाजवली. पण, आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत त्यांना संघाच्या विजयात हातभार लावता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा खेळ मधल्या फळीत गडगडताना दिसत आहे. हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे गोलंदाजी करता येत नसली तरी फलंदाजीतही त्याच्याकडून हवं तसं योगदान मिळत नाही. अशात आजच्या सामन्यात रोहित शर्मा पहिल्या सामन्यात ४९ धावा चोपणाऱ्या ख्रिस लीनला संधी देऊ शकतो आणि क्विंटन डी कॉकला तिसऱ्या क्रमांकावर उतरवू शकतो.   MI Vs PBKS T20 Match, MI Vs PBKS Live Score

  • कृणाल पांड्याला विश्रांती?

कृणाल पांड्यानं चार सामन्यांत फक्त तीन विकेट्स घेतल्या आणि २६ धावाच केल्या आहेत. राहुल चहर त्याच्यावरील जबाबदारी योग्यरितीने पार पाडत आहे, परंतु कृणालकडून त्याला साजेशी साथ मिळताना दिसत नाही. पीयूष चावलाला आज संधी मिळू शकते कारण त्याच्याकडे चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. MI Vs PBKS IPL Matches, MI Vs PBKS IPL match 2021 Video : खतरनाक बाऊन्सर; पाकिस्तानी गोलंदाजाच्या वेगानं फलंदाजाच्या हॅल्मेटचे झाले दोन तुकडे!

  • नॅथन कोल्टर नीलला संधी ?

जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट दमदार कामगिरी करत आहेत, परंतु त्यांच्याकडे तिसरा जलदगती गोलंदाजाचा पर्याय नाही. त्यांनी मार्को जॅन्सेन, अॅडम मिल्ने व जयंत यादव यांना संधी देऊन पाहिली, परंतु एकालाही प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण करता आले नाही. त्यामुळे आज नॅथन कोल्टर नील खेळू शकते. पण, रोहितला एका परदेशी खेळाडूच्या स्थानासाठी लिन व नॅथन यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.  MI Vs PBKS, MI Vs PBKS live score, IPL 2021, IPL 2021 latest news विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video  PBKS vs MI head to headउभय संघांमध्ये २६ सामने झालेत आणि त्यापैकी १४ मुंबई इंडियन्सनं, तर १२ पंजाब किंग्सनं जिंकले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सपंजाब किंग्स