IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं ( MI) पंजाब किंग्सविरुद्ध मुसंडी मारली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. हार्दिक पांड्यानं आजही गोलंदाजी न केल्यानं पुन्हा एकदा त्याच्या तंदुरूस्तीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या सामन्यात कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत असताना दुसरीकडे पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्षदीप सिंगनं अमान्य कृती केली. सौरभ तिवारी थांब थांब म्हणत असतानाही त्यानं जोरात चेंडू फेकून मारला अन् मुंबईचा फलंदाज वेदनेनं कळवळला.
मनदीप सिंग ग व लोकेश राहुल यांना बॅटीशी योग्य संपर्कच होत नव्हता. सहाव्या षटकात कृणाल पांड्यानं पंजाबला पहिला धक्का दिला. मनदीप १५ धावांवर पायचीत झाला. किरॉन पोलार्ड यानं ७व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. गेल १ व लोकेश २१ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्डनं एकाच षटकात ख्रिस गेल व लोकेश राहुल या दोन मोठ्या फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. निकोलस पूरनचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. जसप्रीत बुमराहनं त्याला २ धावांवर पायचीत केलं. एडन मार्कराम व दीपक हुडा यांनी ४ बाद ४८ असा गडगडलेला पंजाबचा डाव सावरला.मार्करामनं २९ चेंडूंत ६ चौकारांसह ४२ धावा केल्या. हुडाही २८ धावा करून माघारी परतला. बुमराहनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. पोलार्डनं १ षटकांत ८ धावांत २ विकेट घेतल्या. पंजाब किंग्सला ६ बाद १३५ धावाच करता आल्या.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचीही सुरुवात काही खास झाली नाही. पंजाब किंग्सचा मागील सामन्यातील स्टार गोलंदाज रवी बिश्नोई यानं आजही कमाल केली. त्यानं पहिल्याच षटकात रोहित शर्मा ( ८) व सूर्यकुमार यादव ( ०) यांची विकेट घेतली. सूर्या गुगलीवर त्रिफळाचीत झाला. आयपीएल २०२१मधील त्याचा फॉर्म सुधरण्याचं नाव काही घेत नाही. बिश्नोईच्या गोलंदाजीवर झेल सोडणे पंजाब किंग्सला महागात पडताना दिसत होते. पण, मोहम्मद शमीनं पंजाबला तिसरा धक्का देताना क्विंटन डी कॉकचा ( २७) अडथळा दूर केला.
१२व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सौरभनं फटका मारला तो अर्षदीपच्या हातात पुन्हा गेला. सौरभनं क्रिज सोडल्याचे अर्षदीपला वाटले, पण तो थांब थांब म्हणत असतानाही त्यानं चेंडू फेकला. तो त्याच्या चुकीच्या जागी लागला व वेदनेनं कळवला.
Web Title: IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : Arshdeep singh chucks the ball straight back at Saurabh Tiwary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.