IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं ( MI) पंजाब किंग्सविरुद्ध मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे. कृणाल पांड्यानं पंजाबला पहिला धक्का दिला आणि त्यानंतर किरॉन पोलार्डनं एकाच षटकात ख्रिस गेल व लोकेश राहुल या दोन मोठ्या फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं या दोन विकेटसह ३०० बळी पूर्ण केले. ट्वेंटी-२०त ३०० विकेट्स व १० हजार+ धावा असा दुहेरी पराक्रम करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आणि म्हणूनच त्याचं सेलिब्रेशनही भन्नाट होतं. पण, या विकेट्सपूर्वी कृणाल पांड्याच्या एका कृतीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं अन् सोशल मीडियावर आता त्याचीच चर्चा सुरू आहे.
फॉर्माशी झगडणाऱ्या इशान किशनला ( ishan kishan) अखेर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ( MI) विश्रांती दिली. पंजाब किंग्सला ( PBKS) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळत आहे. मनदीप सिंग ग व लोकेश राहुल यांना बॅटीशी योग्य संपर्कच होत नव्हता. सहाव्या षटकात कृणाल पांड्यानं पंजाबला पहिला धक्का दिला. मनदीप १५ धावांवर पायचीत झाला. किरॉन पोलार्ड यानं ७व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. गेल १ व लोकेश २१ धावांवर माघारी परतला.
या षटकापूर्वी कृणाल पांड्यानं टाकलेल्या ६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस गेलनं सरळ फटका मारला. त्यानं टोलावलेला चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या लोकेश लाहुलच्या हाताला लागून कृणालकडे आला अन् त्यानं धावबाद केलं. मैदानावरील अम्पायर तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागणात तोच कृणालनं त्यांना थांबवलं. त्याच्या या खिलाडूवृत्तीनं सर्वांचं मन जिंकलं.
Web Title: IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : spirit of the game; Krunal withdrew the run-out appeal on his last delivery after the ball hit KL Rahul Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.