IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला पांड्या बंधूसह अन्य फलंदाज ठरतायेत कारणीभूत!

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : विजयासाठी सर्व आघाड्यांवर मजबूत कामगिरी करायची असते, याचा विसर कदाचित मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पडला असावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:30 PM2021-04-23T23:30:40+5:302021-04-23T23:43:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : After restricting MI to 131/6, PBKS chased down the total for the loss of one wickets and 16 balls to spare | IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला पांड्या बंधूसह अन्य फलंदाज ठरतायेत कारणीभूत!

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला पांड्या बंधूसह अन्य फलंदाज ठरतायेत कारणीभूत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : विजयासाठी सर्व आघाड्यांवर मजबूत कामगिरी करायची असते, याचा विसर कदाचित मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पडला असावा. अखेरच्या सामन्यापर्यंत सामना खेचून नेत जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या जीवावर नेहमीच सामना जिंकता येत नाही. ज्या ट्रेंट बोल्टनं मागील काही सामन्यांत अखेरच्या षटकांत मुंबईला विजय मिळवून दिला. त्याच गोलंदाजाच्या षटकात पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) फलंदाजांनी विजयी धाव घेतली. फलंदाजांचे अपयश हे मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे मुळ कारण ठरत आहे.  IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : 

  • क्विंटन डी कॉकला सातत्यानं येत असलेलं अपयश मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीवर दडपण निर्माण करणारे ठरत आहे. त्यात मागील पर्व गाजवणाऱ्या इशान किशनवरही बॅट रुसलेली पाहायला मिळतेय.
  • परिणाम रोहित शर्माला संघाचा सर्व भार आपल्या खांद्यावर घेऊन खेळावे लागत आहे. त्याचा भार हलका करण्यासाठी संघात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या ही फौज दिसतेय, परंतु प्रत्यक्षात त्याला यापैकी एकाचीही साथ मिळत नाही.
  • फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर लोकेश राहुलनं अंतिम ११मध्ये रवी बिश्नोईला दिलेली संधी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. इशान व सूर्या या दोन महत्त्वाच्या विकेट्स त्यानं मिळवून दिल्या. दीपक हुडानं दुसऱ्याच षटकात विकेट घेत सामन्यात चुरस निर्माण केली.
  • रोहित व सूर्या यांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर मुंबईचा डाव सावरला, परंतु हार्दिक व कृणाल या पांड्या बंधूच्या अतीघाईनं घात केला. या दोघांनी पुन्हा निराश केले. कृणाल गोलंदाजीत कमाल दाखवत असला तरी अष्टपैलू म्हणून ही दोघही भावंड मुंबईला तोंडावर पाडत आहेत.
  • किरॉन पोलार्डचाही फॉर्म कधी परत येईल, हे देवच जाणे. दुखापतीमुळे हार्दिक गोलंदाजी करत नाही, याचा ताण अन्य खेळाडूंवर अप्रत्यक्ष पडतोय. कृणालनं आज तीन षटकांत १०च्या सरासरीनं ३१ धावा दिल्या. ट्रेंट बोल्टनंही ११.२५च्या सरासरीनं धावा दिल्या. 
  • माफक लक्ष असूनही पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी कोणतीच घाई केली नाही. त्यांनी गोलंदाजांचा धैर्यानं सामना करताना सर्वप्रथम भागीदारी रचण्यावर भर दिला आणि त्यामुळेच ते खेळपट्टीवर टीकून बसले. 
  • आधी लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी ५३ धावा जोडल्या, त्यानंतर लोकेश व ख्रिस गेल यांनी ६५ चेंडूंत नाबाद ७९ धावा जोडल्या. पंजाबच्या विजयाचं याच दोन भागीदारी महत्त्वाच्या ठरल्या. 
     

Web Title: IPL 2021 : MI Vs PBKS T20 Match Highlight : After restricting MI to 131/6, PBKS chased down the total for the loss of one wickets and 16 balls to spare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.