Indian Premier League 2021 : हर्षल पटेलच्या ( Harshal Patel) गोलंदाजीसमोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) फलंदाजांनी गुडघे टेकले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून ( Royal Challengers Bangalore) एका सामन्याच पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध ( MI) अशी कामगिरी कोणालाच जमली नव्हती. हर्षलनं २०व्या षटकात MIला चार धक्के दिले. त्यामुळे गतविजेत्यांना ९ बाद १५९ धावांवर समाधान मानावे लागले. IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai
रोहित शर्मा व ख्रिस लीन यांनी सावध सुरुवात केली, परंतु ताळमेळ चुकल्यानं मुंबईची महत्त्वाची विकेट पडली. आयपीएलमध्ये MIकडून पदार्पण करणारा लीन RCBच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना पाहायला मिळाला. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस लीननं फटका मारला आणि रोहितनं धाव घेण्यासाठी मैदान सोडलं. विराट कोहली चेंडूजवळ पोहोचतोय असे दिसताच लीननं रोहितला माघारी जाण्यास सांगितले आणि तोपर्यंत विराटनं चेंडू यष्टींजवळ उभ्या असलेल्या चहलकडे सोपवला. सूर्यकुमार यादव आणि लीन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची गाडी रुळावर आणली. Mi vs RCB Live Score Updates
मुंबईला पहिल्या १० षटकांत १ बाद ८६ धावा करता आल्या. पण, अखेरच्या १० षटकांत त्यांचे ८ फलंदाज केवळ ८३ धावा करून माघारी परतले. हर्षलनं २७ धावांत पाच विकेट्स घेतल्या. RCBसाठी पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळे ( २००८) व जयदेव उनाडकट ( २०१३) यांनी हा पराक्रम केला होता. कायले जेमिन्सननं २७ धावांत १, वॉशिंग्टन सुंदरनं ७ धावांत १ विकेट घेतली. काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला
कृणाल पांड्याची बॅट तोडली..१५ कोटींची बोली लावून RCBनं ताफ्यात घेतल्यानंतर कायले जेमिन्सन नेहमी चर्चेत राहिला. आजही त्याची हवा राहिली. त्यानं ४ षटकांत २७ धावांत १ विकेट घेतली. पण, १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याच्या वेगवान चेंडूंन कृणाल पांड्याच्या बॅटीचे दोन तुकडे झाले. रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?