Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update) या हायव्होल्टेज सामन्यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाची ( IPL 2021) सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकाही संघाला घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. त्यामुळे तटस्थ ठिकाणी खेळण्यावत येणाऱ्या सामन्यांमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबई आणि बंगळुरू यांच्यातला पहिलाच सामना चेन्नईचे एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( RCB won the toss and decided to bowl) Mi vs RCB Live Score Updates
- MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. याआधी मुंबई इंडियन्सनं २०११, २०१३ व २०१५ मध्ये बाजी मारली. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) पाच जेतेपद पटकावली आहे. IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update
- मुंबई इंडियन्सनं मागील दहा सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला ८ वेळा पराभूत केले आहे. २०११मध्ये MI vs RCB असा सामना रंगला होता आणि तो विराट कोहलीच्या संघानं ४३ धावांनी जिंकला होता.
- मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातली जय-पराजयाची आकडेवारी ही १७-१० अशी रोहित शर्माच्या संघाच्या बाजूनं आहे. रोहितनं २००, तर विराटनं १९२ आयपीएल सामने खेळले आहेत. MI vs RCB Live Score, IPL 2021 MI vs RCB, MI vs RCB Live match
- मुंबई इंडियन्सला २०१३नंतर आयपीएलचा एकही सलामीचा सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी मागील आठ पर्वात पहिला सामना गमावला आहे. चेन्नईतील मागील पाचही सामने मुंबईनं जिंकले आहेत, तर बंगलोरला पाचही सामन्यात हार मानावी लागली आहे.
- विराट कोहलीच्या संघात तीन पदार्पणवीर, ग्लेन मॅस्कवेल, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टीन, रजत पाटीदार
- मागच्या पर्वात बाकावर बसलेल्या ख्रिस लीनला यंदा पदार्पणाची संधी मिळाली आहे, क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितील तो आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार आहे, रोहित शर्मासोबत तो सलामीला येईल. ख्रिस लीननं २१० ट्वेंटी-२० सामन्यांत २ शतकं व ३९ अर्धशतकांसह ५७२६ धावा केल्या आहेत. शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या २० वर्षीय मार्को जॅन्सेन यालाही पदार्पणाची कॅप दिली आहे. जॅन्सेन हा डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. त्यानं १० ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. MI vs RCB, MI Vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news
- मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Playing XI vs RCB) - रोहित शर्मा, ख्रिस लीन, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, नॅथन मार्को जॅन्सेन
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ ( Royal Challengers Bangalore playing XI) - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनिएल ख्रिस्टीन, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिन्सन, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, रजत पाटीदार