Join us  

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला

IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai RCBचा कर्णधार विराट कोहलीनंही गोलंदाजांचा चांगला वापर करून घेतला. हर्षल पटेलनं ( Harshal Patel) अखेरच्या षटकात चार विकेट्स घेतल्या आणि संघाला जबरदस्त कमबॅक करून दिले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 9:27 PM

Open in App

Indian Premier League 2021 : रोहित शर्माची विकेट स्वस्तात घेऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सला ( MI) समाधानकारक पल्ला गाठण्यापासून रोखू शकले नाही. ज्याच्या चुकीमुळे रोहित माघारी परतला त्या पदार्पणवीर ख्रिस लीन ( Chris Lynn) यानं ४९ धावांची खेळी साकारताना संघाच्या धावांचा वेग वाढवला. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी छोटेखानी पण सुरेख फलंदाजी केली. RCBच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पदार्पणवीर कायले जेमिन्सननं १५ कोटींच्या बोलीला साजेशी कामगिरी केली. RCBचा कर्णधार विराट कोहलीनंही गोलंदाजांचा चांगला वापर करून घेतला. हर्षल पटेलनं ( Harshal Patel) अखेरच्या षटकात चार विकेट्स घेतल्या आणि संघाला जबरदस्त कमबॅक करून दिले.   Mi vs RCB Live Score Updates

रोहितची विकेट आयती भेटली!रोहित शर्मा व ख्रिस लीन यांनी सावध सुरुवात केली, परंतु ताळमेळ चुकल्यानं मुंबईची महत्त्वाची विकेट पडली. आयपीएलमध्ये MIकडून पदार्पण करणारा लीन RCBच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना पाहायला मिळाला. रोहितनं या सामन्यात पहिला चौकार व पहिला षटकार मारण्याचा मान पटकावला. १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रोहितनं षटकार खेचला. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लीननं फटका मारला आणि रोहितनं धाव घेण्यासाठी मैदान सोडलं. विराट कोहली चेंडूजवळ पोहोचतोय असे दिसताच लीननं रोहितला माघारी जाण्यास सांगितले आणि तोपर्यंत विराटनं चेंडू यष्टींजवळ उभ्या असलेल्या चहलकडे सोपवला. IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update

सूर्यकुमार यादव येताच सामन्याचं चित्र बदललं..रोहित माघीर परतल्यानंतर रिलॅक्स झालेल्या RCBला सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) फटकेबाजीचा सामना करावा लागला. सूर्याचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर ख्रिस लीननंही गिअर चेंज केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. मुंबई इंडियन्सनं पहिल्या १० षटकांत १ बाद ८६ धावा केल्या होत्या. पण, ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर RCBचा १५ कोटींचा गोलंदाज कायले जेमिन्सननं ( Kyle Jamieson) याच्या गोलंदाजीवर सूर्या ( ३१ धावा, ४ चौकार व १ षटकार) यष्टिरक्षक एबी डिव्हिलियर्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. MI vs RCB Live Score, IPL 2021 MI vs RCB, MI vs RCB Live match

१३व्या षटकात वॉशिंग्टन सूंदरला दिली पहिली ओव्हरपॉवर प्लेमध्ये सर्वात इकॉनॉमी गोलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सूंदरला १३व्या षटकात विराटनं गोलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानं पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर स्वतःच्याच गोलंदाजीवर परतीचा सुरेख झेल टिपला. लीन ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ४९ धावांवर माघारी परतला. हार्दिक पाड्याही १३ धावांवर पायचीत झाला. २६ धावांवर इशान किशनला जीवदान देणं RCBला महाग पडले असते, परंतु हर्षल पटेलनं त्याला ( २८) पुढच्याच चेंडूवर पायचीत केलं. 

हर्षल पटेलची हॅटट्रिक हुकली, पण MIचा निम्मा संघ तंबूत पाठवला..कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्यानं मारलेला चेंडू टिपण्याची सोपी संधी विराटकडे होती, परंतु त्याच्या हाताच्या मधून चेंडू उजव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला आदळला. पण, विराटनं मैदान सोडलं नाही. हर्षल पटेलनं २७ धावांत पाच विकेट्स घेतल्या. त्यानं अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले. यापैकी तीन विकेट्स या त्याच्या नावावर होत्या, तर एक धावबाद झाला. मुंबई इंडियन्सनं ९ बाद १५९ धावा केल्या.

RCBसाठी पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळे ( २००८) व जयदेव उनाडकट ( २०१३) यांनी हा पराक्रम केला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स घेणारा हर्षल हा पहिलाच गोलंदाज ठरला

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर