Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update) या हायव्होल्टेज सामन्यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाची ( IPL 2021) सुरुवात होत आहे. RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ( RCB won the toss and decided to bowl). विराट कोहलीच्या संघात ग्लेन मॅस्कवेल, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टीन व रजत पाटीदार हे नवे चेहरे दिसणार आहेत, तर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ख्रिस लीन व मार्को जॅन्सेन पदार्पण करत आहेत. ६ फुट व ८ इंचाच्या मार्कोनं १७ वर्षांचा असताना विराट कोहलीची भंबेरी उडवली होती आणि आज तोच विराटच्या संघासमोर आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. MI vs RCB, MI Vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news Mi vs RCB Live Score Updates
ख्रिस लीन व मार्को जॅन्सेन यांना पदार्पणाची संधीमागच्या पर्वात बाकावर बसलेल्या ख्रिस लीनला यंदा पदार्पणाची संधी मिळाली आहे, क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितील तो आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार आहे, रोहित शर्मासोबत तो सलामीला येईल. ख्रिस लीननं २१० ट्वेंटी-२० सामन्यांत २ शतकं व ३९ अर्धशतकांसह ५७२६ धावा केल्या आहेत. शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या २० वर्षीय मार्को जॅन्सेन यालाही पदार्पणाची कॅप दिली आहे. जॅन्सेन हा डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. त्यानं १० ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. MI vs RCB, MI Vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news IPL 2021 : आयपीएलचा आनंद लुटा आपल्या 'मायबोली'त; विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, संदीप पाटील यांची 'बोलंदाजी'!
कोण आहे मार्को जॅन्सेन? भारताच्या २०१८च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जॅन्सेन व त्याचा भाऊ ड्युअन जॅन्सेन यांनी टीम इंडियाच्या नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. तेव्हा जॅन्सेनचा सामना करताना विराटची भंबेरी उडाली होती. तेव्हा मार्को १७ वर्षांचा होता. मुंबई इंडियन्सनं २० लाखांत त्याला आपल्या ताफ्यात करून घेतले. १३७-१३८kph च्या वेगानं मार्को गोलंदाजी करतो. मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात!