IPL 2021, MI vs RCB Live Updates : मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकली, RCBची कोंडी करण्यासाठी मोठी रणनीती आखली 

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : आणखी एक पराभव मुंबई इंडियन्सच्या ( MI) अडचणीत वाढ करणारा ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 07:05 PM2021-09-26T19:05:09+5:302021-09-26T19:09:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, MI vs RCB Live Updates : MI won the toss and decided to bowl first against RCB, know playing XI, Hardik Pandya Playing Today | IPL 2021, MI vs RCB Live Updates : मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकली, RCBची कोंडी करण्यासाठी मोठी रणनीती आखली 

IPL 2021, MI vs RCB Live Updates : मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकली, RCBची कोंडी करण्यासाठी मोठी रणनीती आखली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : आणखी एक पराभव मुंबई इंडियन्सच्या ( MI) अडचणीत वाढ करणारा ठरू शकतो. त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाविरुद्ध ते हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) मैदानावर उतरवण्याच्या तयारीत आहेत. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे आणि त्यांची सहाव्या स्थानी  घसरण झाली आहे. RCBचीही पराभवाची मालिका कायम असली तरी ते तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आणखी एका पराभवानं त्यांना फारसा फरक पडणार नाही, परंतु MIसाठी आता पुढील मार्ग खडतर आहे. 

  • विराट कोहलीला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी १३ धावांची गरज आहे.  
  • दुबईत मागील २९ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सरासरी १७० धावा केल्या आहेत
  • ग्लेन मॅक्सवेल याच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. जसप्रीत बुमराहविरुद्ध त्यानं ६१ चेंडूंत ७० धावा केल्या आहेत, तर सहावेळा बाद झाला आहे. ट्रेंट बोल्ट ( १९ चेंडूंत २३ धावा ,  दोनवेळा बाद), राहुल चहर ( २८ चेंडूंत ३८ धावा, दोनवेळा बाद) आणि कृणाल पांड्या ( ७८ चेंडूंत ९८ धावा, तीनवेळा बाद) यांच्याविरुद्ध मॅक्सवेलची कामगिरी अशी झाली आहे.  
  • युझवेंद्र चहल हा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसाठी घातकी ठरू शकतो. 
  • आतापर्यंत मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २८ वेळा एकमेकांना भिडले आहेत, त्यात रोहितच्या संघानं १७ विजय मिळवले आहेत. 

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार आहे ( Hardik Pandya Playing Today)  RCBनं आजच्या सामन्यात तीन बदल केले आहेत. वनिंदू हसरंगा, टीम डेव्हिड आणि नवदीप सैनी यांच्याजागी डॅन ख्रिस्टियन, कायले जेमिन्सन व शाहबाज अहमद यांना संधी मिळाली आहे. 

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अॅडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ - विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस्टियन, कायले जेमिन्सन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज 

Web Title: IPL 2021, MI vs RCB Live Updates : MI won the toss and decided to bowl first against RCB, know playing XI, Hardik Pandya Playing Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.